Road Accident CCTV Footage Viral: भारतात रस्ते अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असा एक दिवस नसतो, ज्या दिवशी रस्ते अपघात होत नाही. हे अपघात अनेक वेळा गाडी चालकाच्या चुकीमुळे होतात, तर काही वेळा दुसऱ्यांच्या चुकीमुळे लोकांचा बळी जातो. अपघात हा कधी, कुठे आणि कसा होईल याचा नेम नाही. सध्या याचं एक भयावह उदाहरण नुकतंच सोशल मीडियावर समोर आलं आहे. काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे, तो पाहून प्रत्येक जण थरकापून गेला आहे. शहरातील एका गजबजलेल्या मार्गावर एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. 

सोशल मीडियावर एका भयानक रस्ते अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. यामध्ये असे दिसते की, प्रवाशांनी भरलेली मॅजिक कार अचानक रस्त्याच्या मधोमध थांबते. खरंतर, ड्रायव्हर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत होता. पण, पुढच्याच क्षणी जे काही घडलं ते पाहून तुमचे मन थरारून जाईल.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रवासी गाडी अचानक रस्त्यावर थांबल्यानंतर, एक वेगाने येणारा ट्रक मागून प्रवासी गाडीला इतक्या जोरात धडकतो की मॅजिक कार उडून रस्त्याच्या कडेला पडते. त्यानंतर समोरून येणारा एक बाईकस्वार नियंत्रण गमावून मॅजिकला धडकतो आणि तिथेच पडतो.

या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून जातो. सुमारे ५४ सेकंदांची ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. @gharkekalesh हँडलवरून व्हिडीओ शेअर करताना वापरकर्त्याने सांगितले की, हा हृदयद्रावक अपघात उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये घडला आहे.

वृत्त लिहिण्याच्या वेळेपर्यंत हा व्हिडीओ १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर कमेंट सेक्शनमध्ये या भयानक अपघातासाठी कोण जबाबदार आहे, याबद्दल वापरकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. बरेच वापरकर्ते मॅजिक कार चालकाला दोष देत आहेत, तर बरेच लोक म्हणतात की, ट्रक चालकाने ब्रेक लावला असता तर ही चूक झाली नसती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

पिलीभीत पोलिसांनी या प्रकरणावर टिप्पणी केली की, ट्रक चालकाला बॅरिकेडिंगने पकडले आहे. कायदेशीर कारवाईदेखील केली जात आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ दर्शवितो की, तुमची छोटीशी चूक एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण करू शकते, म्हणून गाडी चालवताना नेहमी सतर्क राहा आणि वाहतूक नियमांचे पालन करा.