Truck Message Board Viral : रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा ट्रकच्या मागे काही भन्नाट कोट्स लिहिलेले असतात, जे वाचून अनेकदा खूप हसायला येते. तर, काही वेळा ट्रकच्या मागे असे काही कोट्स लिहिलेले असतात, जे फार भावनिक असतात किंवा तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. ट्रकच्या मागे मेरा भारत महान, हॉर्न ओके प्लीज हे लिहिलेलंच असतं. पण, त्याशिवायही काही असे कोट्स लिहिलेले असतात, ज्यातून ट्रकमालकाचे एक वेगळेपण दिसून येते. मग ती शेरोशायरी असो, म्हणी किंवा टोमणे. अनेकदा ट्रकमालक आपले चांगले विचार लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी किंवा आवड म्हणून लिहितात; पण हे मेसेज नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एका ट्रकमागील पाटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यावर नातेसंबंधांविषयी एक कोट्स लिहिण्यात आला आहे, जो वाचून तुम्हाही विचारात पडाल. नेमकं या कोट्समध्ये, असं काय लिहिलं आहे ते जाणून घेऊ…

प्रवासादरम्यान बहुतेक वेळा काही ट्रक आपले लक्ष वेधून घेतात. सजावट, म्युझिकल हॉर्न किंवा पाठीमागे लिहिलेल्या डायलॉग्स, शायरीमुळे आपले लक्ष लगेच त्या धावत्या ट्रककडे जाते. दरम्यान, एका ट्रकच्या मागची अशीच एक पाटी व्हायरल होत आहे, जी वाचून तुम्हालाही नातेसंबंधांची जाणीव होईल.

नातेसंबंधांविषयीचा काळजाला भिडणारा सुंदर मेसेज

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून एक ट्रक वेगाने जात आहे. यावेळी ट्रकमागून जाणाऱ्या वाहनातील एका व्यक्तीने त्या ट्रकच्या मागे लिहिलेला काळजाला भिडणारा नातेसंबंधांविषयीचा सुंदर मेसेज व्हिडीओत कॅप्चर केला आहे. जो वाचल्यानंतर अनेकांना आयुष्यात नाती जपणं किती महत्त्वाचे असतं याची जाणीव झाली आहे. ट्रकमागची ती पाटी वाचून अनेकांनी खरंच आयुष्यात नाती किती महत्त्वाची असतात हे अधोरेखित केलं आहे. आता तुम्हालाही उत्सुकता लागून राहिली असेल की, रिक्षाचालकानं असं नेमकं लिहिलंय तरी काय?

India Railways : ट्रेनच्या डब्यावर H1, H2, A1 का लिहिलेले असते? याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

ट्रकमालकानं ट्रकच्या मागील बाजूला छोट्या पाटीवर नात्यांविषयी एक महत्त्वाचा मेसेज लिहिला आहे. “वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळते, जपले असते तर संपले नसते…” यातून आयुष्यात जर प्रत्येक क्षण आनंदात उत्साहात जगायचा असेल, तर नाती किती गरजेची आहेत हे अधोरेखित करण्यात आलं आहे. कारण- निघून गेल्यावर किंवा एखादं नात तुटल्यावर आपण त्याविषयी बोलतो, पण तीच नाती वेळीच जपली असती किंवा टिकवली असती, तर ती तुटली नसती, पश्चात्ताप करण्याची वेळ आली नसती, असा मेसेज देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सध्या ट्रकमागील संदेशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Pawan Marathe (@pawanmarathe_pk)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

pawanmarathe_pk नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सत्य वचन…” अशा प्रकारे अनेक जण या व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये भावनिक कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, ट्रकवरच्या पाट्या वाचून हुशार नसते होत भाऊ. आयुष्यात खरा अनुभव खूप काही शिकवतो. जरा फिरा बाहेर ट्रकच्या मागे न पाहता. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, जपले असते, तर संपले नसते. मग तो पैसा असो किंवा नाती. अशा प्रकारे युजर्स नातेसंबंधांविषयीची मते व्यक्ती करीत आहेत.