Luck Saves Man from Accident: आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेत दररोज असंख्य फोटो आणि व्हिडीओ समोर येतात. पण, त्यापैकी काहीच व्हिडीओ असे असतात जे लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणतात. आता गावच्या गल्लीत घडलेला हा प्रसंग पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहील. काही सेकंद उशीर झाला असता तर एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असता… पण नशिबाने त्यांना मृत्यूपासून वाचवले. सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसतं की एक ‘काका’ सहज चालत असताना अचानक मृत्यूच्या दारात पोहोचतात आणि चमत्कारिकरीत्या वाचतात. इतक्या थरारक पद्धतीने घडलेली ही घटना पाहून लोक थक्क झाले आहेत आणि म्हणतायत, “हा माणूस खरोखरच नशिबवान आहे!”

व्हायरल व्हिडीओत काय दिसलं?

व्हिडीओमध्ये दिसतं की, एक काका गावातल्या गल्लीमध्ये निवांतपणे फिरत असतात. चालता चालता ते एका भिंतीजवळ थांबतात आणि भिंतीच्या पलीकडे काय आहे हे पाहण्यासाठी तिकडे डोकावतात. पण, तिथून नीट काहीच न दिसल्यामुळे ते थोडं पुढे सरकतात आणि नेमक्या त्याच क्षणी भिंतीचा तोच भाग, जिथे काही क्षणांपूर्वी काका उभे होते तो अचानक कोसळतो.

क्षणभरात काय घडलं ते समजायलाच वेळ लागत नाही. जर ते अजूनही त्या जुन्या जागी उभे राहिले असते तर थेट भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडले असते. पण, नशिबाने ते काही पावलं पुढे गेले आणि अगदी मृत्यूच्या दारात जाऊनही सुखरूप बचावले.

लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील ghantaa नावाच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला असून काही तासांतच त्याला २८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, “अंकल कुणाच्या घरात डोकावून पाहत होते, देवाने घाबरवून सोडलं!” दुसरा लिहितो, “जेव्हा मृत्यू दुसऱ्या आयुष्याची संधी देतो तेव्हा हेच घडतं.” तिसरा म्हणतो, “मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की काका नेमकं काय पाहात होते?” तर चौथ्याने भन्नाट प्रतिक्रिया दिली, “मृत्यूला छेडून परत जगायला येणं यालाच म्हणतात.”

हा प्रकार पाहिल्यानंतर अनेकजण एकच म्हणत आहेत की, काकांचा जीव वाचणं म्हणजे खरंच नियतीची करामत. काही सेकंदांच्या फरकामुळे आज ते जिवंत आहेत, नाहीतर एका साध्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली त्यांचं सर्वस्व संपलं असतं.

येथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि हा अनुभव लोकांसाठी मोठा धडा ठरत आहे. “मृत्यू कधी, कुठे, कसा येईल सांगता येत नाही. पण, नशीब जोरावर असेल तर अगदी थेट दारी आलेला मृत्यूही परत फिरतो!”