Viral Video : जी-२० (G-20) शिखर परिषद यंदा दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. जी-२० शिखर परिषदेचा कालावधी ९ व १० सप्टेंबर २०२३ असा असणार आहे. जी-२० परिषद दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जी-२० चे आयोजन करणाऱ्या दिल्लीला पूर्णपणे सजवण्यात आले आहे. तर याचदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिल्लीत कुतुबमिनारवर एक अनोखा लेझर शो दाखवण्यात आला आहे; जो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ दिल्लीचा आहे आणि कुतुबमिनारवर एक अनोखा लेझर शो पाहायला मिळाला आहे. कुतुबमिनारवर विविध रंगांचे विद्युत दिवे लावण्यात आले असून, भारताच्या विविध संस्कृतींचे अनोखे दर्शन लेझर शोच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. कुतुबमिनारवर होणाऱ्या या लेझर शोमध्ये गुजरातमधील होडका व डांग या गावांसह भारतातील काही प्रमुख गावांची नावे दाखवण्यात आली आहेत. तसेच कुतुबमिनारवर विविध रंगांनी बनवलेल्या कलाकृतीही साकारण्यात आल्या आहेत. या व्हिडीओतील खास गोष्ट अशी की, लेझर शोदरम्यान कुतुबमिनारवरून चांद्रयान-3 मिशनचे प्रक्षेपण आणि त्यादरम्यान पांढऱ्या रंगाचे अवकाशयान वेगाने उडताना दिसत आहे. कुतुबमिनारवर दाखवण्यात आलेला हा अदभुत नजारा एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच …

हेही वाचा…हेच खरं प्रेम! आजोबांनी पाकिटात अजूनही जपून ठेवलाय आजीचा फोटो, आजोबांचे प्रेम पाहून नेटकरी झाले भावुक…

व्हिडीओ नक्की बघा :

कुतुबमिनारवर चांद्रयान-३ चा लेझर शो :

चांद्रयान-३ ही भारतीय अंतराळ संशोधनाची तिसरी मोहीम यशस्वीरीत्या पार पडली आहे. यादरम्यान अनेक माध्यमांतून चांद्रयान-३ साठी खास गोष्टी करण्यात येत आहेत आणि त्यातच आता कुतुबमिनावरदेखील चांद्रयान-३ चे खास प्रक्षेपण दाखवण्यात आले आहे. कुतुबमिनारचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. लेझर शोदरम्यानचा कुतुबमिनार अगदी बघण्यासारखा आहे .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा अद्भुत व्हिडीओ @ashishkaushik यांच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओद्वारे कुतुबमिनारचे अप्रतिम दृश्य ..; ज्यामध्ये भारतीय संस्कृती आणि चांद्रयान-३ च्या यशाचा विक्रम दाखवण्यात आला आहे. #जी-२० असे कॅप्शन त्याला देण्यात आले आहे आणि हा अद्भुत नजारा सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.