रस्त्यावरून वाहन चालवताना प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक असते. हे सर्व नियम तुमच्या आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी बनवलेले असतात. परंतु, काही लोक या नियमांचे गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर अतिशय निष्काळजीपणे वाहन चालवतात. अशा लोकांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यांवर अपघाताच्या घटना घडतात. अशा चालकांसाठी रस्त्यांवर ठिकठिकाणी वेगवेगळ्या सूचना देणारे साइनबोर्ड्स लावले जातात. पण, एका रस्त्यावर असा साइनबोर्ड लावण्यात आला आहे की, जो वाचून चालकच काय रस्त्यावरून जाणारे लोकही गोंधळात पडले आहेत. हा साइनबोर्ड बेंगळुरूमधील एका रस्त्यावरील असल्याचे सांगितले जात आहे; ज्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जेव्हा तुम्ही हा बोर्ड पहिल्यांदा पहाल तेव्हा तुम्हाला ‘Follow Someone Home’ असे लिहिलेले दिसेल, कारण ते अगदी मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे. हे वाचून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण नीट वाचल्यावर त्यावर लिहिलेला खरा मेसेज तुम्हाला कळेल. या बोर्डवर ‘वाहतुकीचे नियम पाळा, घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे’ (Follow Traffic Rules Someone Is Waiting At Home For You) असे लिहिले आहे. त्याखाली पुन्हा ‘वाहतूक नियमांचे पालन करा’ असे लिहिले आहे.

व्हायरल पोस्ट येथे पाहा

दरम्यान, @RaoSumukh नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा साइनबोर्ड चांगला आहे असे कोणाला वाटते?’ ड्रायव्हिंग करताना यावरील मजकूर खूप खराब पद्धतीने वाचला जाईल. तुम्हाला यातील लहान फॉन्टमध्ये असलेला मजकूर पटकन दिसणार नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनेकांनी रस्त्यावरील या साइनबोर्डची खिल्ली उडवली आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, वैतागलेल्या चालकांसाठी हे एक मनोरंजन असेल. तर आणखी एकाने हे मीमसाठी भारी असल्याचे म्हटलेय. अनेकांनी साइनबोर्डवरील क्रिएटिव्हिटीला दाद दिली आहे.