Python Swallows Goat Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. कधी मनोरंजक तर कधी रोमांचक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. कधी कधी अंगावर शहारे आणणारे व्हिडीओही पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही चांगलेच थक्क झाले आहेत. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…

सापाचं नाव काढताच अनेकांना घाम फुटतो. साप दुरून जरी दिसला तरी लोकांची रात्रीची झोप उडते. अनेक लोक तर सापांना इतके घाबरतात की, त्यांचे व्हिडीओ देखील बघत नाहीत. अशात जर अजगर समोर आला तर मग विषयच संपतो. अजगर व्यक्तीला जिवंत गिळू शकतो. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो बघून तुम्ही हैराण व्हाल. सध्या सोशल मीडियावर एक अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक भला मोठा अजगर आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या बकरीला गिळण्याचा प्रयत्न करतो… आणि तेच त्याच्या जीवावर उठतं. उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील हर्रैया परिसरातल्या बरदौलिया गावाजवळील नागमणि आश्रमाजवळ कचनी नाल्याच्या भागात घडलेली ही घटना आज सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

हा अजगर जवळपास २० फूट लांब असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की, हा अजगर एका मोठ्या बकरीला शिकार करतो आणि संथपणे तिला गिळायला सुरुवात करतो. काही वेळातच बकरी पूर्णपणे त्याच्या पोटात जाते. पण, तिथेच त्याच्या अडचणी सुरू होतात. बकरीचं वजन आणि आकार एवढा मोठा असतो की अजगराला ते पचवणं अशक्य होतं. काही क्षणातच त्याला घुसमटायला व्हायला सुरुवात होते.

अजगराच्या हालचाली थांबतात, शरीर वेदनेने फडफडतं आणि शेवटी त्याला आपली चूक लक्षात येते. त्यानंतर तो ज्या बकरीला गिळलं होतं, तिला तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, अजगर बकरीला आपल्या तोंडातून बाहेर टाकतो. हा संपूर्ण थरार १ मिनिट ५७ सेकंदाच्या व्हिडीओत कैद झाला असून लाखो लोकांनी तो पाहिलाय.

या प्रकारावर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिहिलं, “अजगराची हेकडी बघायला मिळाली… आणि मग गायब झाली” तर काहींनी याला “निसर्गाचा न्याय म्हटलं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

विशेष म्हणजे अजगर आपल्या ताकदीच्या जोरावर शिकार गिळतो. मात्र, बकरीसारखा मोठा प्राणी गिळल्यावर त्यालाही जीव वाचवणं कठीण झालं. शेवटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला शिकार तोंडातून बाहेर काढावी लागली.