मोबाईल वापराचे वाढते व्यसन किंवा ॲडिक्शन ही आजच्या काळातील मोठी समस्या बनली आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये संपूर्ण शिक्षण व्यवस्था ऑनलाइन मोडवर असताना, त्याच काळात मुलांच्या हातातही मोबाईल पडल्याने त्यांना मोबाईनलच्या वापराची घातक सवय लागली आहे.मोबाईलचे व्यसन हे अत्यंत धोकादायक बनले आहे, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होत आहे. अशा स्थितीत मुलांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून आता त्यांना मोबाईलचे व्यसन सोडवण्याचे काम केले जात आहे. मूलभूत शिक्षण परिषदेच्या दीड लाखांहून अधिक प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सुमारे दोन कोटी मुले आहेत. अशा परिस्थितीत अधिकाधिक मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी मैदानी खेळांचा अवलंब केला जाणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये, आधुनिकतेसोबतच मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याची संकल्पना राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच अनुषंगाने पारंपारिक खेळ जोपासण्यासाठी राज्य शिक्षण संस्थेचे तज्ज्ञ पुढाकार घेणार आहेत.संस्थेचे तज्ज्ञ एनईपी अंतर्गत सुरू झालेल्या बॅगलेस डेनिमित्त मुलांना खेळण्यासाठी पारंपरिक खेळांवर आधारित सचित्र बिगबुक बनवणार आहेत.

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Funny Answer Sheets Viral
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांने सांगितला नवा उपाय; व्हायरल उत्तरपत्रिका वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

प्रशिक्षण परिषदेची परवानगी मागितली

बिगबुक तयार करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची परवानगी घेण्यात आल्याचे राज्य शिक्षण संस्थेचे प्राचार्य नवल किशोर सांगतात. शाळेतील बगलेस डेच्या दिवशी हे मोठे पुस्तक शिक्षक मुलांसाठी वापरतील. यामध्ये मुलांमधील वाढती मोबाईल संस्कृती कमी होण्यास मदत होईल.

प्रशिक्षण परिषदेची परवानगी मागितली –

बिगबुक तयार करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची परवानगी घेण्यात आल्याचे राज्य शिक्षण संस्थेचे प्राचार्य नवल किशोर यांनी सांगितले. शाळेतील बॅगलेस डेच्या दिवशी हे मोठे पुस्तक शिक्षक मुलांसाठी वापरतील. यामध्ये मुलांमधील वाढती मोबाईल संस्कृती कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा – Video: पंतप्रधान मोदींना पाणीपुरी खाताना पाहून, जपानी राजदूतांनीही धरला हट्ट, अन्…

मुलांना पारंपारिक खेळाचा विसर –

संस्थेच्या सहाय्यक उपशिक्षण संचालिका आणि राज्य शिक्षण संस्थेत होलिस्टिक एज्युकेशनचे समन्वय साधणाऱ्या डॉ. दीप्ती मिश्रा सांगतात की, सध्या मुले पारंपारिक खेळांना पूर्णपणे विसरत आहेत. कारण व्हॉट्सअॅप मीन्स आणि यूट्यूब चॅनल्समध्ये व्हिडिओ गेम्स, प्रँक व्हिडिओ, रील्समध्ये ते इतके मग्न झाल्यामुळे आता घराबाहेर जाऊन त्यांना गेम्स खेळायचे नाहीत. हे सर्व खेळ मुलांनी खेळले तर त्यांची मानसिक व शारीरिक क्षमता वाढेल. यासाठी त्यांना नव्या दिशेने नेणे अत्यंत आवश्यक आहे.