Viral video: अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की कोणतंही काम करण्याआधी देवाचा आशिर्वाद घेणं गरजेचं आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की केवळ सामान्य लोकच नाही तर चोरदेखील चोरी करण्याआधी देवाचा आशिर्वाद घेतात असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की हा चोर अजब आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

गेल्या काही काळात चोरीच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. चोर अगदी देवाची मंदिरं देखील सोडत नाहीत. देवाचे दागिने, मुर्ती, दानपेट्या सर्रासपणे चोरल्या जात आहेत. अशाच एका चोरीच्या घटनेने खळबळ उडवली आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती मंदिरात जातो आणि चारही बाजूंना बघतो. यानंतर तो देवाच्या पाया पडतो आणि मग मंदिरातील मूर्ती घेऊन तिथून फरार होतो. फुटेज पाहून असं वाटतं की त्याचा दुसरा साथीदारही मंदिराच्या बाहेर त्याची वाट पाहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना तेव्हा घडली जेव्हा पुजारी मंदिरातून बाहेर गेले होते. ते परत आले तेव्हा मुर्ती गायब होती.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> धावत्या स्कूटीवर मिठी मारली, अंगावर ब्लँकेट घेतलं अन्…; मुंबईतील बँड्रा येथील कपलचा VIDEO तुफान व्हायरल

हा व्हिडीओ @MhdZubair_ या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की हा चोर चोरी करण्याआधी माफी मागत आहे. नक्कीच त्याला पैशांची फार गरज असेल म्हणून तो मंदिरातून चोरी करत आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं, की मला तर हा चोर अतिशय निर्मळ मनाचा दिसत आहे. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

CCTV फुटेजच्या आधारावर तो चोर लवकरच पकडला जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. मंदिरात चोरी झाल्यामुळे लोकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. त्यामुळे या चोरांना लवकरात लवकर शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.