Vande Bharat Sleeper Train Video : भारतीय रेल्वेत वेगाने आधुनिक बदल होत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन याचेच एक उदाहरण आहे. वंदे भारत ट्रेनमुळे भारतीय रेल्वेला एक नवीन ओळख मिळाली आहे. सध्या वंदे भारत ट्रेनमध्ये फक्त चेअर कारची सुविधा आहे तसेच ही भारतातील पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. पण आता भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेनची योजना आखली आहे. जी डिसेंबर २०२४ पर्यंत रुळावर येण्याची शक्यता आहे, अशात वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर कोचमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्लीपर कोचमधील आतील पहिली झलक पाहायला मिळत आहे. यात सीटिंग चेअरपासून, कॉरिडॉरपर्यंत सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. यातील इंटिरियर इतके सुंदर आहे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

वंदे भारत स्लीपर ट्रेनचा ‘हा’ व्हिडीओ पाहून व्हाल चकित

वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर कोचमधील व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कोचचा दरवाजा उघडल्यापासून पुढे जे काही दिसते ते पाहूनच तुम्हाला समजेल की, ही सामान्य ट्रेन नाही. हा कोच इतका व्यवस्थितरित्या डिझाइन केला आहे की, कोणालाही त्यातून प्रवास करायला आवडेल. या वंदे भारतचे स्लीपर कोच विमानाच्या आतील इंटिरियरलाही टक्कर देत आहे. पुश बटण प्रेस करताच दरवाजा ऑटोमॅडिकली उघडतो. स्लीपर सीट्स अधिक आरामदायक आणि आकर्षक दिसत आहेत. याशिवाय त्या खूप मोठ्या देखील आहे. संपूर्ण कोच एसी असून राखाडी रंगाचे इंटिरियर त्याच्या सौंदर्यात भर घालत आहे.

रुंद कॉरिडॉर आणि मोठे वॉशरुम

वंदे भारत स्लीपर कोचचा कॉरिडॉर अतिशय रुंद आणि आकर्षक आहे. सामान्य गाड्यांच्या तुलनेत लांब आणि मोकळा कॉरिडॉर खरोखरच सुंदर दिसत आहे, याशिवाय ट्रेनचे वॉशरुम्स जास्त रुंद आणि मोठे आहेत ज्यात वॉश बेसिन देखील बसवण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे सर्व फार काळ टिकणार नाही”, व्हिडीओवर युजर्सच्या कमेंट्स

@IndianTechGuide नावाच्या X अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, जो आत्तापर्यंत अनेकांनी पाहिला आणि त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, हे सर्व फार काळ टिकणार नाही, देशातील जनता यालाही वाटून घेईल. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, इंटीरियर जितके सुंदर असेल तितके तिकीट जास्त असेल. तर तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, गुटखा खाणाऱ्यांवर या ट्रेनमधून बंदी घातली पाहिजे