Viral Video Today: सोशल मीडियावर सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. एकीकडे जोडपं लग्नबंधनात अडकताना सिंगल मंडळींची दुखणी जास्तच उफाळून येत आहेत. अशातच आपल्याच एखाद्या जुन्या गर्लफ्रेंडचं लग्न लागत असेल तर काळजावर होणारे घाव सांगायलाच नकोत. रणबीर कपूरने जेव्हापासून ए दिल है मुश्किल चित्रपटात चन्ना मेरेया गात अनुष्काच्या लग्नात एंट्री घेतली होती तेव्हापासून आपणही आपल्या एक्सच्या लग्नात जाऊन गावं नाचावं अशी इच्छा अनेकांमध्ये दिसून आली आहे. यातील काहींची तर अशी भीड चेपलेली असते की ते आपल्या जुन्या जोडीदाराच्या लग्नात जाऊन धिंगाणा करतातही, असाच काहीसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यात नवरोबा बघत बसले आणि नवरीने आपल्या जुन्या बॉयफ्रेंडसहच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नवरा नवरीच्या पेहेरावावरून व आजूबाजूचा परिसर पाहता सुदैवाने हा व्हिडीओ महाराष्ट्रातील आहे असं वाटत नाही. यात एक वरात निघाली आहे. ज्यावेळी अचानक एक तरुण कुठल्यातरी ब्रेकअप च्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्याच्या समोर नवी नवरी आणि तिच्या बाजूला नवरोबा उभे आहेत. तू पश्चतायेगी असं म्हणत आपल्या जुन्या प्रियकराने डान्स सुरु करताच नवरी काहीतरीच इमोशनल होते आणि चक्क त्याला मिठी मारते. नवरीचा जाऊदे पण नवऱ्याच्याच चेहऱ्यावर यावेळी प्रचंड पश्चाताप दिसून येत आहे.
वरातीतच चेहऱ्यावर वाजले बारा
हे ही वाचा<< Video: ब्युटी पार्लरमध्ये शिरला दारुडा नवरा, ग्राहक महिलेला मारहाण; बायकोने गळा धरला अन् तिथेच..
दरम्यान काही क्षण हा व्हिडीओ बघून कदाचित हा तिचा भाऊ असावा असे कयास लोक बांधत होते, पण ज्या पद्धतीने तो तरुण नाचत आहे आणि त्यावर त्या नवऱ्याची जशी प्रतिक्रिया आहे ते पाहून हा भावाचा डान्स वाटत नाही हे नक्की.
ट्विटरवर शेअर केल्यापासून या व्हिडीओला ३ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून कळवा!