Bride Shocking Reaction Video: लग्नमंडपात घडणारा प्रत्येक क्षण हा एखाद्या जोडप्यासाठी आयुष्यभराची आठवण ठरत असतो. एकमेकांच्या गळ्यात हार घालताना, नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तर आयुष्य बदलणारा क्षण वधू- वर अनुभवत असतात. सोशल मीडियाच्या काळात तर इतरांच्याही लग्नातील असे अनेक सुंदर क्षण आपल्याला अनुभवता येतात. अर्थात सोशल मीडिया म्हटलं की नुसत्या गोड गोड आठवणी नाही तर कधी कधी झटका बसेल असे धक्कादायक प्रकार सुद्धा पाहायला मिळतात. एका लग्नातील धडकी भरवणारा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नव्या नवरीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून लोक थक्क झाले आहेत. लग्नात रिसेप्शनच्या स्टेजवर हा सगळा सावळा गोंधळ घडला. पण नेमकं असं झालं तरी काय, चला पाहूया..

@byomkesbakshy या अकाउंटवर शेअर केलेला अवघ्या १७ सेकंदाचा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समोर आलेले नाही. पण तुम्ही साधारण वऱ्हाड्यांच्या व नवरा नवरीच्या लग्नाच्या कपड्यांवरून अंदाज लावू शकता की हा प्रकार उत्तरेकडे घडला असावा. यात नवरदेव व नवरीसाठी सजवलेल्या सोफ्यावर नवरी एकटीच बसली होती व नवरा बाजूला उभा राहून तिला हाक मारून थांबवू पाहत आहे. तर सोफ्याच्या मागे सुद्धा एक माणूस दिसतोय जो नवरीला हाक मारतोय. नवरीचा चेहरा मात्र पूर्णपणे थरथरतोय, तिच्या भिरभिरणाऱ्या पापण्यांमधून डोळे स्पष्ट दिसतही नाहीयेत. डोळे फिरवण्याचे हावभाव करत ती नवऱ्याकडून बघून जोरजोरात हसतेय. नवरा तर हा सगळा प्रकार बघून हादरून गेला आहे.

दरम्यान, ७ लाखाहून अधिक व्ह्यूज व पाच हजाराहून अधिक लाईक्स असणाऱ्या या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. नवरा बिचारा कोमात जाईल असं म्हणत अनेकांनी बिचाऱ्या नवरदेवाची कीव येत असल्याचे लिहिले आहेत. काहींनी तर लिहिलंय की, “कदाचित त्या नवरीला फिट वगैरे आली असेल” पण त्यावर प्रत्युत्तर देताना अनेकांनी असंही विचारलंय की, “जर तिला आजार वगैरे असेल तर ती अशी हसतेय का?”. काहींनी असेही अंदाज बांधले आहेत की मागे दिसणारा माणूस हा त्या नवरीचा बॉयफ्रेंड असून तो तिला असे प्रकार करण्यासाठी सांगतोय तिचा नवरा हे पाहून पळून गेल्यावर ती सुद्धा बॉयफ्रेंड बरोबर निघून जाईल. हे सगळं घडत असताना सुरुवातीला नवरा पटकन तिला ‘पागल औरत’ असं म्हणतो जे ऐकून लोकांनी हसण्याच्या ईमोजी पोस्ट केल्या आहेत.