Deepika Padukone Roast Kangana: अभिनेत्री कंगना रनौत ही सोशल मीडियावर काही ना काही कारणाने सदैव चर्चेत असते. काही वेळा बेताल तर काही वेळा नेमकी चपराक बसवणारी कंगनाची वक्तव्य बॉलिवूड ते राजकारण सर्वत्र प्रसिद्ध आहेत. करण जोहर असो किंवा अगदी राजकारणातील कोणतं मोठं नाव असो कंगना सगळ्यांविरुद्ध अनेकदा उभी राहिली आहे. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात चक्क दीपिका पदुकोणने चार शब्दात कंगनाचं पार हसं केल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ पाहून कंगनाच्या फॅन्सला धक्का बसला आहेच. पण एरवी गोड बोलणारी दीपिका अचानक एवढे कमाल टोमणे कशी मारू लागली हे बघून डीपीचे फॅन्सही थक्क झाले आहेत. असं नेमकं झालं तरी काय पाहूया…

दीपिका व कंगनाचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये विद्या बालन सुद्धा पाहायला मिळतेय. कंगना या व्हिडिओमध्ये लोकं कशी अभिनेत्रींना सेन्स ऑफ ह्युमर नाही असे समजतात या वाक्याने बोलायला सुरुवात करते. लोकांना कित्येकदा मस्करी समजत नाही ते विनोदांवर काही प्रतिक्रियाच देत नाहीत अशा पद्धतीच संभाषण सुरु असतं. यावर विद्या बालन सुद्धा खळखळून हसत असते व कंगनाचं म्हणणं पटत असल्याचे दाखवते पण तितक्यात दीपिका असं काही बोलून जाते की कंगना सुद्धा काही क्षण स्तब्धच होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video: दीपिकाने कंगनाला मारला फुल्ल टॉस टोमणा

दरम्यान, हा व्हिडीओ जुन्या कार्यक्रमातील असून सध्या नव्याने व्हायरल होत आहे. यावर दोघींच्या फॅन्सनी भरपूर कमेंट करत दीपिकाच्या खेळकरपणाची दाद दिली आहे. तर काहींनी बॉलिवूडमध्ये अशा हेल्दी चर्चा होतात यावर विश्वासच बसत नाही असेही म्हंटले आहे.