अंकिता देशकर

Delhi Floods Viral Video: दिल्लीतील यमुनेच्या पाण्याची पातळी सतत वाढत असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. सार्वजनिक वाहतुकीवर याचा परिणाम होत आहे, यामुळे राजधानीमध्ये आपत्कालीन उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. यादरम्यान, लाईटहाऊस जर्नालिझमला एक व्हिडिओ ट्विटर वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले, या व्हिडिओ मध्ये लोक रस्त्यावर पोहताना दिसत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून नागरिकांना आवाहन करत विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय पूरग्रस्त ठिकाणी सेल्फीसाठी गर्दी करू नये असेही सुनावले आहे. तरीही नागरिकांनी रस्त्यावर पोहण्यासाठी गर्दी केल्याचे दाखवणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या प्रकरणातील खरी बाजू काय हे ही आता जाणून घेऊया…

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर India Today ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केली.

अन्य यूजर देखील हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि काही स्क्रीनग्रॅब मिळवून तपासणी सुरू केली. आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च वापरून प्रत्येक स्क्रीनग्रॅब शोधला. कीफ्रेमद्वारे आम्हाला bhaskar.com वर प्रकाशित एक बातमी दिसून आली.

https://money.bhaskar.com/local/uttar-pradesh/kannauj/news/water-filled-up-to-4-feet-on-the-highway-vehicles-removed-from-the-service-lane-131524840.html

कनौजमधील एका महामार्गावर ही घटना घडल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे. ‘कनौज जिल्ह्यातील एका गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे पाणी साचले होते. ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी भरले होते, लहान मुले आणि तरुण स्विमिंगपूलसारखा या डबक्याचा आनंद घेत आहेत. सर्व्हिस लेनवरून वाहने काढावी लागत आहे.’

आम्हाला tv9hindi.com वर देखील अशीच एक बातमी मिळाली.

https://www.tv9hindi.com/state/uttar-pradesh/water-filled-up-on-national-highway-in-kannauj-up-1976828.html

तसेच आम्हाला नवभारत टाइम्स वर देखील हि बातमी सापडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/kannauj/kannauj-national-highway-filled-with-rain-water-villagers-seen-bathing/articleshow/101719364.cms

निष्कर्ष: जलमय रस्त्यांवर पोहणाऱ्या लोकांचा व्हायरल व्हिडिओ दिल्लीचा नसून यूपीच्या कन्नौजजवळील राष्ट्रीय महामार्गावरील आहे.