सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही आपणाला पोट धरुन हसवतात, तर काही रडवतात. परंतु काही व्हिडीओ असे असतात जे आपणाला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. खरं तर, आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही. शिवाय सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात लोकांना आपल्यातील टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते. याच सोशल मीडियामुळे अनेकजण रात्रीत फेमस झाल्याचंही आपण पाहिलं आहे. ज्या लोकांना आपल्यातील कलागुण दाखवण्याची संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक व्हिडीओमधील मुलाच्या कलेचं खूप कौतुक करत आहेत.

चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल –

सध्या एका लहान मुलाचा हातात ढोलक घेऊन गाणे गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाचा आवाज ऐकूण आणि ढोलक वाजवण्याची कला पाहून तेथील एका व्यक्तीने त्याचा व्हिडीओ शूट केला. जो सध्या व्हायरल होतोय. या मुलाचा व्हिडीओ शूट करणारा व्यक्ती त्याला त्याच्याशी संबंधित माहिती विचारतो त्यावेळी तो मुलगा सांगतो, “माझं नाव दीपक असून मी २ वर्षापासून गायला सुरुवात केली आहे.” यानंतर समोरच्या व्यक्तीने गाणे म्हणायची विनंती करताच तो मुलगा भजन म्हणायला सुरुवात करतो.

हेही पाहा- लँडिंगदरम्यान विमान थेट समुद्रात घुसलं, जीव वाचवण्यासाठी पाण्यात पोहणाऱ्या प्रवाशांचा VIDEO होतोय व्हायरल

नेटकऱ्यांनी केलं तोंडभरुन कौतुक –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर indian_singing नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ७४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका यूजरने लिहिलं, बाळा थोडा अभ्यास कर तुला कोणीही थांबवू शकणार नाही. तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “अशी मुलं आपल्या देशाची शान आहेत.”