Viral Video: प्राण्यांचे विविध व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्यात कधी प्राण्यांमधील मैत्री तर कधी प्राण्यांमधील भांडणं आपण पाहतो. आता अशाच दोन श्वानांचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एकजण बॉलसोबत खेळताना दिसत आहेत. तर दुसरा रेतीमध्ये खट्टा खोदताना दिसत आहे. त्यानंतर अचानक असं काही होतं, जे पाहून या व्हिडीओवर युजर्सही मोठ्या प्रमाणात पसंती देताना दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @dogsofinstagram या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला दोन श्वान समुद्रकिनाऱ्यावर खेळताना दिसत आहेत; त्यातील एक श्वान बॉलसोबत खेळत असताना अचानक त्याचा बॉल समुद्राच्या लाटांजवळ जातो. लाटांजवळ गेलेला बॉल पाहून तो घाबरतो, तेव्हा अचानक दुसरा श्वान बॉल आणण्यासाठी धावतो आणि तो तोंडातून घेऊन येतो. घाबरलेला श्वान तो बॉल घेऊन खेळायला सुरुवात करतो. हा सुंदर व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये “मोठा भाऊ बचावासाठी धावला… आम्ही लवकरच आमच्या नावावर जगू, ड्यूक द वॉटर बॉय,” असं लिहिण्यात आले आहे.

हेही वाचा: गरम होतंय म्हणून चक्क कारमध्ये लावला घरातला एसी; PHOTO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

भावाबद्दलचं हे प्रेम पाहून सोशल मीडियावर युजर्स त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओला आत्तापर्यंत इन्स्टाग्रामवर सुमारे नऊ मिलियन व्ह्यूज मिळाले असून आठ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “मोठ्या भावाने मदतीसाठी स्वतःचे काम थांबवले! खूप गोड”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मोठे भाऊ ग्रेट आहे”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “हे नातं खूप अनमोल आहे”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “असा भाऊ प्रत्येकाला मिळो.”