Mumbai Local Viral Video: मुंबई लोकल आणि भांडण हे एक अतूट समीकरण आहे. लोकलचे काही प्रवासी अगदी भल्या भल्यांना लाजवतील अश्या तोऱ्यात वावरतात. काहीवेळा तर तिकीट नसतानाही या मंडळींना कशाचीच भीती वाटत नाही. त्यातही हे प्रवासी कॉलेजचे विद्यार्थी असतील तर त्यांचं वागणं तर काही सांगायलाच नको. अशाच दोन कॉलेजला जाणाऱ्या तरुणांना अलीकडेच ठाणे स्टेशनवर टीसीने पकडले होते. तिकीट नसल्याने या दोघांना ऑफिसमध्ये नेऊन दंड भरण्यास सांगण्यात आले. पण त्यावेळी या तरुणांनी उलट टीसीलाच धारेवर धरायला सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये कोण खरं कोण खोटं याचा अंदाज तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच लावता येईल.
तुम्ही पाहू शकता की, महिला टीसीने दोन विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणांना पकडलं होतं. यावेळी मुलांच्या म्हणण्यानुसार ते दंड भरायला तयार होते पण त्या टीसीने त्यांच्या समोर अन्य दोन विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना विना दंड सोडून दिलं पण या तरुणांना दंड भरण्यास सांगितलं. त्यांना का सोडून दिलं यावरून हा वाद सुरु झाला होता. मग हे तरुण आपल्या फोनमध्ये व्हिडीओ शूट करू लागताच महिला टीसी सुद्धा भडकल्या त्यांनीही तरुणांना सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली.
तू मला विचारणारा कोण? तुला मी इतरांनी भरलेल्या दंडाची पावती का दाखवू? मी सरकारी कर्मचारी आहे तुला तक्रार करायची तर माझं नाव विचार पण व्हिडीओ शूट करायचा हक्क तुला कुणी दिला? असे प्रश्न महिला टीसी विचारताना दिसत आहे. तर तरुणही खूप भडकले आहेत.
Video: महिला टीसी आणि तरुणांमध्ये तुफान वाद
हे ही वाचा<< आधी ओठावर चुंबन, मग जिभेला जीभ… दलाई लामा यांचा लहान मुलासह व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांचा संताप
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी तरुणांची बाजू घेत टीसीच्या अरेरावीवर टीका केली आहे. तर काहींनी मात्र तरुणांची पण चूक आहे ते उगाच खरेपणाचा आव आणत आहेत असे म्हंटले आहे. जरी तुमची बाजू खरी असली तरी तुमच्याकडे तिकीट नाही हे ही तितकं खरं आहे त्यामुळे तुम्ही असा वाद घालू शकत नाही असेही नेटकऱ्यांनी लिहिले आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा.