Viral Video: लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो, काळानुसार हा निर्णय घेण्याची मुभा स्त्री पुरुष दोघांनाही देण्यात आली आहे, पण अजूनही आपल्याच देशात असे काही भाग आहेत जिथे आजही मुलींच्या मनाविरुद्ध त्यांना एका जन्मभराच्या नात्यात अडकवले जाते. अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ याचे ज्वलंत उदाहरण आहे. यामध्ये कदाचित या तरुणीला आपले लग्न कोणाशी लावले जाणार आहे याची कल्पना नसावी. जेव्हा लग्नमंडपात ही तरुणी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला बघते तेव्हा तिचा पारा असा चढतो की ती भरमंडपात सगळ्यांना खडेबोल ऐकवते. तरुणीने केवळ नवऱ्यालाच नव्हे तर स्वतःच्या कुटुंबियांना सुद्धा चांगलेच सुनावल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नेमका हा व्हिडीओ आहे तरी काय जाणून घेऊयात..
ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण नवरी लग्नमंडपात रुसल्याचे दिसत आहे. आता हा काही लाडिक रुसवा नसून तिचा खरोखरच पारा चढल्याचे दिसतेय. होणारा नवरा हा आपल्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे अशी या नवरीची तक्रार होती. तक्रार करताना नवरी इतकी चिडते की ती समोरच त्या माणसाचा पाणउतारा करू लागते. याच्या तोंडात दात नाही, पोटात आतड्या नसतील, यांच्याकडून मला काय सुख मिळणार आहे? काहीच नाही अशा भाषेशी नवरी बोलू लागता आजूबाजूची मंडळी तिची मनधरणी करण्याची सुरुवात करतात. मुलाला चांगली नोकरी आहे असे समजवायला जाताच ती वर त्यांना उत्तर देत नोकरी काय चाटायची आहे का? असा उद्धट प्रश्न करते.
व्हिडिओमध्ये सगळे तिला समजावताना दिसत आहेत. यात काही जण तिला कुटुंबाच्या इज्जतीचा विचार कर असं सांगताच ती त्या सगळ्यांना ऐकवते. तुम्हाला स्वतःच नाक कापलं जाईल वाटतं पण माझा जीव जाईल त्याचं काय? असे नवरी या व्हिडिओमध्ये बोलताना ऐकू येत आहे.
भरमंडपात नवरीने असं काही केलं की वऱ्हाडी झाले खजील
हे ही वाचा<< Video: बाबा रे पळ! भरमंडपात नवरीने नवऱ्यावर बंदूक रोखून धरला नेम; हातात कागद देत म्हणली, “आता या क्षणी..”
दरम्यान, हा व्हिडीओ कदाचित ठरवून बनवलेला असावा असा अंदाज आहे. जर हा व्हिडीओ खरा असेल तरी या मुलीने स्वतःच्या कुटुंबाला ऐकवताना त्या माणसाचा अपमान करायची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया या नेटकऱ्यांनी व्हिडिओवर दिली आहे.