सोशल मीडियावर दिवसभरात शेकडो व्हिडीओ शेअर होतात. मात्र त्यामधील काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या लंडनमधील एका स्पॅनिश-भारतीय मॉडेलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याचे कारण म्हणजे तिने परिधान केलेला भारतीय पद्धतीचा पोशाख. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर श्रद्धा नावाच्या मॉडेलने तिच्या @shr9ddha नावाच्या अकाउंटवरून घागरा आणि दागिने घालून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये श्रद्धाने लाल रंगाचा अत्यंत सुंदर असा घागरा घातला आहे. त्यावर सोनेरी रंगाचे भारी नक्षीकाम केले आहे. गळ्यात दागिने, डोक्यावर बिंदी, कानातले आणि नाकात नथ घातलेली आपल्याला पाहायला मिळते. एवढेच नाही तर श्रद्धाने अतिशय सुंदर असा मेकअप आणि केशभूषाही केलेली आहे. अगदी एखाद्या नवरीप्रमाणे ती या पोशाखात दिसत आहे.

हेही वाचा : अरे डोळे दुखले रे! पॉर्नस्टार Johnny Sins रणवीर सिंगबरोबर मालिकेत करतोय काम; मिम्स पाहून व्हाल हैराण

असा सुंदर घागरा आणि दागिने घालून श्रद्धा लंडनच्या मेट्रोमधून आणि रस्त्यांवरून फिरत असताना लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खास शूट केलेल्या आहेत. श्रद्धाकडे सर्वजण अगदी कौतुकाने आणि टक लावून पाहत आहेत. काहीजण तिचे फोटो काढून घेत आहेत; तर काही तिला ती खूप सुंदर दिसत आहे असे सांगत आहेत. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनीदेखील त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या पाहा.

“एखादी सुंदर राजकुमारी पाहिल्यासारखे सगळे तुझ्याकडे पाहत आहेत!” असे एकाने लिहिले आहे. “बापरे खुपच सुंदर! घागऱ्यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहात.” असे दुसऱ्याने म्हंटले आहे. तर व्हिडीओमध्ये एक बाई श्रद्धाला ती फारच सुंदर दिसत आहे असे म्हणताना आपण पाहू शकतो. तर बाजूने चालणारी मुलगी तर श्रद्धाला पाहून अवाक झाल्याचे तिने दिलेल्या हावभावांवरून समजते.

हेही वाचा : Kiss Day 2024 : चुंबनाचे प्रकार किती? कोणत्या Kiss चा काय अर्थ असतो, जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्याला आत्तापर्यंत ४४.६ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.