Viral Video : वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. वारकरी दरवर्षी आतुरतेने वारीची वाट बघतात. वारी हा विठ्ठल भक्तांसाठी सर्वात मोठा उत्सव असतो. वारीमध्ये हजारो वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पायी चालतात आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचतात. सध्या वारीला सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर वारीचे अनेक व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे.

२० तारखेला वारीचे पुण्यात आगमन झाले होते. श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अनेक पुणेकरांनी सहभाग घेतला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी दिसून आली. पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. टाळ मृदंग वाजवणारे, फेर फुगड्या खेळणारे, हरिनामाचा जयघोष करणारे अनेक वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले पण यादरम्यान एक असा व्हिडीओ व्हायरल झाला. लोक वारीतील पालखी सोहळ्याचे व्हिडीओ रील बनवण्याच्या नादात हात जोडताना दिसले नाही. खरंच रील व्हिडीओच्या नादात आपण आपली संस्कृती विसरत आहोत का?, असा प्रश्न या व्हिडीओद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराजवळील आहे. या मंदिरासमोरून श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी जाताना दिसत आहे. या दरम्यान रस्त्याच्या कडेला लोकांची गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे कोणीही या पालखीला हात जोडताना दिसून आले नाही कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल होता आणि ते पालखीचे व्हिडीओ किंवा फोटा काढत होते. या व्हिडीओद्वारे प्रश्न विचारला की आपण रील किंवा व्हिडीओच्या नादात हात जोडायचे विसरलो का? सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

framingpune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माफी असावी देवा..!” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे चित्ती असावे समाधान !” तर एका युजरने लिहिलेय, “पण त्यांच्या मुळेच जे तिथं प्रत्यक्षात जाऊ नाही शकत त्यांना दर्शन होते” आणखी एका युजरने लिहिलेय, “१००% खरय.. काल सगळीकडे तेच दिसत होतं” अनेक युजर्सनी लिहिलेय की हे क्षण कॅमेऱ्यात टिपल्याने अनेकांना पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्याची संधी मिळते. तर काही युजर्सनी मोबाईलच्या वापरामुळे आपण आपली मुल्ये विसरत असल्याची टीका केली आहे.