घरामध्ये असणारे पाळीव प्राणी आपल्या गोंडस आणि निरागस चेहऱ्याने कोणाच्याही चेहऱ्यावर खुद्कन हसू आणू शकतात. कुत्रे-मांजरी आणि त्यांचे मालक हे खेळायला लागले की कुणाला कशाचेही भान राहत नाही. आपल्या मालकावर या निरागस जीवांचा पूर्ण विश्वास असतो; विशेषतः कुत्र्यांचा. कुत्रा आपल्या मालकाच्या सर्व आज्ञांचे कायम पालन करणारा, त्याची रक्षा करणारा आणि त्यावर जीवापाड प्रेम करणारा प्राणी आहे. कुत्र्यांचे आणि त्यांच्या मालकांमधील मैत्रीचे नाते हे कुणीही समजू शकत नाही. अगदी पलंगावर पांघरूणात गुरफटून झोपण्यापासून ते लांबच्या प्रवासापर्यंत ते दोघे कायम एकत्र असतात.

अशाच एका भन्नाट मालक आणि एका कुत्र्याच्या जोडीचा व्हिडीओ एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @Enezator या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तरुणाने काळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची अर्धी पॅन्ट घातलेली आहे. त्यासोबतच, त्याच्या पायामध्ये स्केटिंग शूज आणि पाठीवर निळ्या रंगाच्या दप्तरासारख्या बॅगेत एका अत्यंत गोंडस आणि चॉकलेटी-सोनेरी, काळ्या रंगाच्या केसाळ कुत्र्याला बसवले आहे. हे दोघेही अगदी आरामात उंच घाट रस्त्यावर स्केटिंग करत पुढे जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चारचाकी गाडीत बसलेल्या व्यक्तीने शूट केला आहे. “मी असाच बरा आहे” [I’m fine like this] असे Enezator या वापरकर्त्याने त्याच्या अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओखाली कॅप्शन लिहिले आहे.

हेही वाचा : ‘आसमान को छू कर देखा’ गाणे म्हणत मेट्रोमध्ये रंगली मैफिल! सोशल मीडियावर व्हायरल होणारा भन्नाट व्हिडीओ पाहा….

त्या तरुणाच्या पाठीवर अतिशय आरामात आणि सवय असल्याप्रमाणे तो कुत्रा बसलेला असून, प्रवासाचा मस्त आनंद घेत आहे. या व्हिडीओने अनेक नेटकऱ्यांचे मन जिंकले असून, त्यांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत ते पाहू.

“आईगं, किती गोड व्हिडीओ आहे”, असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “व्हिडीओमधील तरुण, त्याच्या पाठीवर बसलेला कुत्रा आणि मागचे निसर्गरम्य दृश्य, तीनही गोष्टी खूपच सुंदर आहेत”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “या दोघांमधली मैत्री खूप छान आहे”, असे तिसऱ्याचे मत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ २८ डिसेंबरला एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी याला भरपूर पसंती दिली आहे. त्यासोबतच या व्हिडीओला आतापर्यंत ३.४ मिलियन इतके व्ह्यूज आणि २८.४ k इतके लाईक्सदेखील मिळाले आहेत.