गोंडस मांजरीचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. मालकाची नक्कल करतानाचे, ‘कॅट स्पा डे’, मांजर ट्रेडमिलवर चालतानाचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक गोंडस व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मांजर पायऱ्या उतर असल्याचे दिसत आहे. पण ही मांजर ज्याप्रकारे पायऱ्या उतरत आहे हे पाहून अनेकांना त्यांच्या रविवारच्या मूडची आठवण झाली आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अजबच! सरकारी अधिकाऱ्यापुढे कुत्र्यासारखा भुंकू लागला हा माणूस; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये ही मांजर घसरगुंडीवर ज्याप्रकारे घसरत आपण खाली येतो, तशी पायऱ्या उतरत आहे. आठवड्यामधील व्यग्र शेड्युलनंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी फक्त आराम करायचे नियोजन केले जाते, त्यावेळी अगदी सोपे काम करण्याचाही कसा कंटाळा येऊ शकतो, हे या मांजरीच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.