Video Shows Man Set Guinness World Record to make tallest house of cards : सुटीच्या दिवसांमध्ये किंवा प्रवासात वेळ जावा म्हणून तर कधी विरंगुळा म्हणून आपल्यातील अनेक जण पत्ते खेळतात. तुम्ही आतापर्यंत पत्त्यांच्या मदतीने अनेक खेळ खेळला असाल. पण, आज एका व्यक्तीने याच पत्त्यांच्या मदतीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जिंकला आहे. व्यक्तीनं पत्त्यांच्या मदतीनं ५४ थरांचं घर बांधलं आहे. तसेच हा रेकॉर्ड इतका आव्हानात्मक होता की, घराचा शेवटचा थर पूर्ण करण्यासाठी व्यक्तीला शिडीची मदत घ्यावी लागली. नक्की कसा केला हा रेकॉर्ड पूर्ण, किती तास लागले ते आपण जाणून घेऊ…

अमेरिकन रहिवासी, आर्किटेक्ट व प्रसिद्ध कार्ड-स्टॅकिंग कलाकार ब्रायन बर्ग यांनी एका हवाबंद खोलीत पत्त्यांचे थर रचले आहेत. अवघ्या आठ तासात त्यांनी ५४ थर असलेलं पत्त्यांचं घर बांधलं. टायमर सुरू होताच बर्ग यांनी खाली एक सपाट लादी ठेवून, त्यावर अगदी लक्षपूर्वक थर लावण्यास सुरुवात केली. शेवटचा थर पूर्ण करण्यासाठी तर त्यांना अगदी शिडीचीसुद्धा मदत घ्यावी लागली. त्यानंतर फायनल टचअपसाठी त्यांनी घरावर कौल म्हणून HONOR MagicV3 हा हलका स्मार्टफोन ठेवला. कसं बनवलं पत्त्यांचं हे घर ते व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…काय सांगता? ट्रेन, बसमध्ये नाही, तर व्यक्ती झोपली थेट रेल्वे रुळांवर; छत्री डोक्यावर घेतली अन्… पाहा मजेशीर VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

पत्त्यांच्या मदतीने सुंदररीत्या उभारलं घर :

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, HONOR MagicV3 स्मार्टफोन किती हलका व पातळ आहे हे तपासण्यासाठी हे चॅलेंज बर्ग यांना देण्यात आलं होतं; जे त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवलं आहे. तर सगळ्यात खास गोष्ट म्हणजे बर्ग यांनी स्वतःच्या कलेचं सादरीकरण करताना वायर किंवा कोणत्याही धातूचा आधार न घेता, पत्त्यांचं हे उत्कृष्ट घर बांधलं आहे. तसेच हा जबरदस्त रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी त्यांनी हवाबंद खोलीचा वापर केला; जेणेकरून पत्ते स्थिर राहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या अधिकृत @guinnessworldrecords या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आठ तासांत बांधलं गेलेलं पत्त्यांचं सर्वांत उंच घर! ब्रायन बर्ग यांचं त्याच्या नवीन विक्रमाबद्दल आणि त्यांचा HONOR MagicV3 किती हलका आणि पातळ आहे हे तपासण्यासाठी ऑनरचं आव्हान पूर्ण केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन”, अशी कॅप्शन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने व्हिडीओला दिली आहे. यापूर्वी बर्गनं १०.३९ मीटर (३४ इंच १ इंच) लांब, २.८८ मीटर (९ फूट ५ इंच) उंच व ३.५४ मीटर (११ फूट ७ इंच) रुंद अशा तीन मकाऊ हॉटेल्सची प्रतिकृती तयार करून, जगातील सर्वांत मोठी प्लेइंग कार्ड्सची रचनादेखील तयार केली होती. हा विक्रम मात्र गेल्या वर्षी भारतातील अर्णव डागा यांनी मोडला होता. त्यांच्या रचनेची लांबी १२.२१ मीटर (४० फूट), उंची ३.४७ मीटर (११ फूट ४ इंच) व रुंदी ५.०८ मीटर (१६ फूट ८ इंच) होती.