अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील एका व्यक्तीला पोलिसांनी वेगात गाडी चालवल्याप्रकरणी पकडल्यानंतर त्याने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर आरोप केले. एका पोलिस अधिकार्‍याशी वाद घालणार्‍या अज्ञात व्यक्तीचे बॉडीकॅम फुटेज मंगळवारी फ्लॅगलर काउंटी शेरीफ ऑफिस फेसबुक पेजवर पोस्ट केले गेले.

हा व्हिडीओ २४ फेब्रुवारी २०२२ चा आहे. त्याच दिवशी पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिला होता. रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हरने स्टॉप साइन असतानाही गाडी चालवली आणि ३० मैल प्रति तासाच्या झोनमध्ये ५० मैल वेगाने गाडी चालवली. जेव्हा त्याला वेगाचे कारण विचारण्यात आले तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले की पुतिन यांनी संभाव्य हल्ल्याचा आदेश दिल्याच्या घटनेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी त्याला लवकर घरी पोहचायचे आहे.

(हे ही वाचा: Viral Photo: ओळखा पाहू; हा फोटो भारतातील कोणत्या राज्यातील आहे?)

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोत लपलेला हिम बिबट्या तुम्ही शोधू शकता का? फोटोग्राफरच होतय कौतुक)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्हाला खरे सांगू, मला आत्ताच कळले की पुतिन यांनी नुकतेच सांगितले आहे की ते जगाविरूद्ध अणु थर्मल युद्ध सुरू करणार आहेत,” ड्रायव्हरने अधिकाऱ्याला समजावून सांगितले. काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या घरी परत जाण्याचा प्रयत्न करत होतो. मी इथे घाबरत आहे, ठीक आहे. माझे युक्रेनमध्ये लोक आहेत.” असं तो बोलतो.