Viral Poster: हल्ली सोशल मीडियामुळे ‘पुणेरी पाट्या’ सातत्याने चर्चेत असतात. मोजक्या आणि खोचक शब्दांत समोरच्याला जास्तीत जास्त माहिती या पाट्यांद्वारे दिली जाते. सध्या पुणेरी पाट्यांप्रमाणेच अनेक तरुण भररस्त्यात काही पोस्टर घेऊन उभे असतात, ज्यावर काही विनोदी किंवा समाजप्रबोधन करणारी वाक्यं लिहिलेली असतात. सध्या असंच एक पोस्टर खूप व्हायरल होतंय जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

नवरा-बायकोतील भांडणं जगजाहीर आहेत. बहुतेक पती-पत्नीत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतातच. अगदी क्षुल्लक कारणावरूनही जोडपी भांडत असतात. त्यात अनेकदा नवरा आपल्याशी एखादी गोष्ट खोटं बोलला यावरूनही होतात; पण नवरा आपल्याशी खोटं बोलतोय हे या बायकांना समजतं कसं, असा प्रश्न अनेक पुरुषांना पडत असेल. अशाच आशयाची एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होतोय, जे वाचून तुम्हालाही तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

या व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पुरुष हातात पोस्टर घेऊन उभा असून, त्याच्या हातातील पोस्टरवर हिंदी भाषेत, ‘अपनी पत्नी से कभी झूठ मत बोलिये, क्योंकि वो आपसे वही बात पूछती है, जो उसे पहले से ही पता हो’, असे वाक्य लिहिले आहे. म्हणजे पोस्टवरील वाक्याचा मराठी अर्थ पाहायला गेल्यास ‘तुमच्या बायकोशी कधीच खोटं बोलू नका. कारण- ती तुम्हाला तोच प्रश्न विचारते, ज्याचे उत्तर तिला आधीपासून ठाऊक असते’ हे मजेशीर पोस्टर सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vikalp_malvi_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “मग ती कशाला विचारते?”. तर दुसऱ्याने लिहिले, “अगदी बरोबर बोललास.” तर आणखी एकाने लिहिलेय, “माझ्याबरोबर असंच होतं.”