Man Quits Corporate Job For Family : चांगल्या पगाराची नोकरी की आवडीचे काम असे पर्याय तुमच्यासमोर मांडले की, कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी कदाचित काही जण चांगल्या पगाराची निवड करतील. तर अनेक जण आवडीच्या काम करायला धावत जातील. तर काही जण यात नक्की कोणता पर्याय निवडावा याबद्दल एखाद्याला विचारायला जातील. पण, कधी कधी आपण नफा, तोटा नाही तर आपल्याला काय आवडते, आपण कोणती गोष्ट निवडल्यावर आनंदी राहू याकडेही बघणे तितकेच महत्वाचे असते. आज असेच काहीसे सांगणारी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
linkedin युजर @Varun Agarwal’s सकाळी उबरने प्रवास करत होता. त्याच्या ड्रॉयव्हरचे नाव दीपेश असे होते. त्याने यापूर्वी रिलायन्स रिटेलमध्ये काम करून त्याच्या करिअरची सुरुवात केली होतो. तसेच रिलायन्स रिटेलमध्ये त्याला महिन्याला सुमारे ४० हजार रुपये पगार होता. पण, काही वर्ष ओलांडून गेल्यावर त्याला जाणवले की, पत्नी आणि मुलांना फारसा वेळ द्यायलाही मिळत नव्हते. कामाच्या आयुष्यातही कोणताही समतोल नव्हता. म्हणून त्याने ४० हजार पगाराची नोकरी सोडून उबर कंपनीत ड्रायव्हर होण्याचा निर्णय घेतला.
स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या (Viral Post)
आता तो महिन्याला सुमारे ५६ हजार रुपये कमवतो आणि महिन्यातून फक्त २१ दिवस काम करतो. अखेर कॉर्पोरेट नोकरीदरम्यान शोधत असणाऱ्या काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल सापडला. ड्रायव्हिंग व्यवसाय करत असताना, त्याने दुसरी कार खरेदी करण्यासाठी पुरेशी बचत देखील; त्यानंतर ड्रायव्हर भाड्याने घेतला आणि आता तो स्वतःचं काहीतरी करण्याच्या तयारीत आहे. कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःचे निर्णय योग्य वेळी स्वतः च घ्यावे लागतात.
पोस्ट नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट युजर @Varun Agarwal’s च्या linkedin अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये दीपेशची संपूर्ण गोष्ट लिहिली आहे. युजर्स सुद्धा पोस्ट वाढून दीपेशच्या प्रवासाचे आणि मानसिकतेचे कौतुक करताना दिसत आहेत. तर काही जण “जोखीम घेणे महत्वाचे आहे”, “कोणीही तुमच्यासाठी विचार करत नाही. तुमच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या”, “यश फक्त जास्त पैसे कमवून नाही तर आवडीनुसार आयुष्य जगून येते” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.