दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट जगभर गाजत आहे. सोशल मीडियावर , ‘पुष्पा’च्या अप्रतिम संवाद आणि जबरदस्त गाण्यांच्या हुक स्टेप्सवर बनवलेले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका IAS अधिकाऱ्याने नवजात बाळाची एक क्लिप शेअर केली आहे. तो व्हिडीओ बघून लोकांना ‘पुष्पा’चा ‘मैं झुकेगा नहीं’ हा प्रसिद्ध डायलॉग आठवला. सोशल मीडियावर आता हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या गोंडस मुलाच्या ‘पुष्पा’ स्वॅगचे चाहते झाले आहेत.

अवघ्या तीन सेकंदाच्या क्लिपमध्ये नवजात बाळ ‘पुष्पा’ची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. या क्लिपच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी पुष्पाचा लोकप्रिय डायलॉग ‘मैं झुकेगा नहीं’ देखील जोडला आहे. हा चांगलाच व्हायरल झाला आहे.

(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)

(हे ही वाचा: Video: स्मृती मानधनाचा ‘हा’ SIX एकदा बघाच; पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोमवारी ट्विटरवर शेअर केला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले “ये तो पक्का कभी झुकेगा नहीं.” म्हणजेच ‘हा निश्चितपणे कधीही झुकणार नाही.’ आत्तापर्यंत या व्हिडीओला १६ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे २ हजार रिट्विट्स केले गेले आहेत. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत.