Viral Video: सर्वांत लोकप्रिय, साहसी खेळांपैकी एक म्हणजे ‘बंजी जम्पिंग’ आहे. या खेळात उपकरणांना क्रेनच्या साह्यानं काही फूट उंचीवर ठेवलं जातं आणि इच्छुक व्यक्तींना उडी मारण्यासाठी तेथे काही फूट खोल जागा ठेवण्यात येते. या खेळात मोठ्या उंचीवरून उडी मारण्याची कृती एका साहसापेक्षा कमी नव्हे. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका दिव्यांग तरुणानं ‘बंजी जम्पिंग’ करण्याचा आनंद लुटला आहे.

व्हायरल व्हिडीओ हृषिकेश ॲडव्हेंचर येथील आहे. या व्हिडीओमध्ये एका दिव्यांग तरुणानं बंजी जम्पिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. बंजी जम्पिंग करण्यासाठी तो व्हीलचेअरवर बसून बंजी जम्पिंग स्पॉटवर चढतो. त्यानंतर त्याच्याबरोबर असणारे त्याचे मित्र त्याला व्हीलचेअरवरून उचलून खाली ठेवतात आणि तेथील कर्मचारी त्याला सुरक्षा उपकरणं लावतात. त्यानंतर तरुण ११७ मीटर (अंदाजे ३८४ फूट) वरून उडी मारताना दिसत आहे आणि याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. एकदा पाहाच हा व्हिडीओ.

हेही वाचा…‘आज जेवणासाठी काय बनवू…’ महिलांच्या आवडी-निवडी सांगणारा हृदयस्पर्शी VIDEO, तुम्हालाही विचार करायला पाडेल भाग

व्हिडीओ नक्की बघा…

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ दिव्यांग तरुणाच्या मित्रानं शेअर करून लिहिलं, “बंजी जम्पिंग हेच आहे की, तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या किती तयार करू शकता किंवा स्वतःला चांगल्या गोष्टी कारण्यासाठी कसं प्रोत्साहन देऊ शकता. एखादी व्यक्ती मोठी आहे की लहान, बारीक आहे की जाड यानं काही फरक पडत नाही; फक्त तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या तुमच्या भीतीला सामोरं जाण्यासाठी किती धाडस करू शकता आहात हे पाहण्यासाठी हा खेळ प्रवेशयोग्य आहे”, अशी सुंदर कॅप्शन या पोस्टला दिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ollieheadon आणि @14.maddy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हीलचेअरवर बसलेल्या गृहस्थाचं नाव माधव कुलियाल असून, तो हृषिकेशचा रहिवासी आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तरुणाच्या धाडसाचं विविध शब्दांत कमेंट्समध्ये कौतुक केलं आहे.