अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांचा तुरुंगात डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महाशिवरात्रीच्या वेळेचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात महाशिवरात्रीच्या दिवशी भजन कीर्तनादरम्यान, आसाराम बापू इतर कैद्यांसह व्हिडीओमध्ये नाचताना दिसत आहेत.

१५ वेळा केला जामिनासाठी अर्ज

त्यांनी आत्तापर्यंत जवळ जवळ १५ हून अधिक वेळा जामिनासाठी अर्ज केला आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत आसाराम यांनी कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहेत. परंतु न्यायालयाने आसारामला जामीन मंजूर केलेला नाही. दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क नाचताना दिसत आहेत.

(हे ही वाचा: Viral Photo: ओळखा पाहू; हा फोटो भारतातील कोणत्या राज्यातील आहे?)

मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूर सेंट्रल जेलमध्ये महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला झालेल्या भजनात आसारामही सहभागी झाले होते, त्याचवेळी तुरुंगात कोणीतरी हा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आसारामचा जामीन अर्ज फेटाळला, तर उच्च न्यायालयाने वैद्यकीय मंडळाची स्थापना केली. त्याचवेळी बोर्डाच्या अहवालावर न्यायालयाने आसाराम यांची याचिका फेटाळून लावली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आसाराम निरोगी असल्याचे दिसत आहेत आणि भक्तीगीतांवर डोलताना दिसत आहेत.

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोत लपलेला हिम बिबट्या तुम्ही शोधू शकता का? फोटोग्राफरच होतय कौतुक)

(हे ही वाचा: ‘या’ देसी जुगाडासमोर मोठी मशीनही फेल; हा viral video एकदा बघाच!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१८ मध्ये जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेसह एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. दोषी आसारामला अखेरच्या श्वासापर्यंत तुरुंगातच राहावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले होते.