Dance viral video : आजकाल सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ म्हणजेच तो लहानाचा असो वा मोठ्यांचा, ते व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात आणि सोशल मीडियावर फक्त विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षकही आपल्या टॅलेंटने धुमाकूळ घालताना दिसत आहेत. असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
याचेच एक भन्नाट उदाहरण म्हणजे बेंगळुरूतील ग्लोबल अकॅडमी ऑफ टेक्नॉलॉजी (GAT) या संस्थेतील प्राध्यापक पुष्पा राज यांचा जबरदस्त डान्स व्हिडीओ. ‘मुकाबला’ या आयकॉनिक बॉलीवूड गाण्यावर त्यांनी दिलेला परफॉर्मन्स इतका अफलातून ठरला की, सोशल मीडियावर तो क्षणात व्हायरल झाला. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, सर्व जण या प्राध्यापकांच्या एनर्जी आणि डान्स मूव्ह्जवर फिदा झाले आहेत.
या व्हिडीओत प्राध्यापक पुष्पा राज मंचावर उभे राहून ‘मुकाबला’ या गाण्याच्या तालावर धमाकेदार डान्स करताना दिसतात. त्यांच्या प्रत्येक स्टेपमध्ये एक वेगळा जोश जाणवतो. मधेच त्यांचा एक जरी बूट निघून गेला तरी त्यांनी तो सहजतेने हाताळत दुसरा बूट काढून नाच सुरूच ठेवला. हा क्षण पाहून प्रेक्षकांनी दाद दिली. कारण- त्यांनी संपूर्ण परफॉर्मन्समध्ये एक सेकंदही गोंधळ न होऊ देता परफॉर्मन्स पूर्ण केला. अशा प्रोफेशनल अॅटिट्यूडमुळे प्राध्यापक पुष्पा राज यांना सोशल मीडियावर ‘डान्स मास्टर’ म्हणून ओळख मिळू लागली आहे.
पाहा व्हिडिओ
व्हिडीओच्या इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिलंय- ‘आमच्या प्राध्यापकांचा आणखी एक जबरदस्त परफॉर्मन्स’ या एका ओळीतच विद्यार्थ्यांनी आपल्या प्राध्यापकांबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे. व्हिडीओ पाहणाऱ्यांनीही त्यावर अफाट प्रतिक्रिया दिल्या आहेत . एका युजरनं लिहिलं, “नर्तक म्हणून जन्माला आलो; पण प्रोफेसर करायला भाग पाडले.” तर दुसऱ्यानं म्हटलं, “भाऊंनी आपल्या आवडीचा त्याग केला आणि कुटुंबासाठी शिक्षक बनले.” अनेकांनी त्यांना ”भारतीय मायकेल जॅक्सन” असं संबोधलं आहे. आणखी एका युजरनं लिहिलं, “त्यानं ज्या पद्धतीनं दुसरा बूट काढला… एकदम प्रोफेशनल वाटलं” या प्रतिक्रियांवरून लोक त्यांचा स्टेज प्रेझेन्स आणि आत्मविश्वासाची प्रशंसा करताना दिसतात.
अशा प्रकारे सोशल मीडियावर आता शिक्षक आणि सामान्य लोक दोघेही आपला कलाविष्कार जगासमोर मांडत आहेत आणि हेच दाखवून देत आहेत की, टॅलेंट कोणत्याही चौकटीत बसत नाही.
