Karva Chauth Viral Video 2025 : जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर रिलेशनमध्ये (नात्यात) असता तेव्हा सुरूवातीला एकमेकांच्या सर्वच गोष्टी चांगल्या वाटू लागतात. पण, केव्हा केव्हा समोरच्याकडून प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळत नसते. मग चिडचिड, तक्रारी या गोष्टी नात्यामध्ये दिसतात. पण, जेव्हा प्रयत्न, प्रेम, विश्वास दोन्हीकडून दाखवला जातो; तेव्हा मात्र नात्याला एक वेगळीच दिशा मिळते. आज सोशल मीडियावर असेच काहीसे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

ज्याप्रमाणे महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी केली जाते. अगदी त्याच प्रमाणे उत्तर भारतामध्ये करवा चौथ साजरा केला जातो. पती-पत्नीच्या नात्याला आखणी घट्ट करणारा सण मनाला जातो. पण, आज प्रेमाची वेगळीच व्याख्या बघायला मिळाली आहे. तुम्ही अनेकदा पहिले असेल या सणानिमित्त टेरेसवर महिला लाल रंगाची पारंपरिक साडी नेसून चंद्र दिसल्यानंतर ती चाळणीतून आधी चंद्राला आणि नंतर पतीला बघून अन्न-पाणी ग्रहण करतात. पण, आजच्या व्हायरल व्हिडीओत करवा चौथ या सणादरम्यान जोडपं ट्रेनमधून प्रवास करत असते.

“करोडो लोकांमधल्या एकालाच अशी बायको मिळते” (Viral Video)

मग यादरम्यान नवरा आणि बायको ट्रेनच्या दारापाशी येऊन बसतात. चंद्र दिसू लागल्यावर बायको चाळणीतून चंद्राला आणि मग नवऱ्याला बघते. त्यानंतर नवऱ्याच्या पाया पडते. त्यानंतर नवरा बायकोला मिठाई भरवतो आणि पाणी प्यायला देतो. यादरम्यान बायकोचा तोल जाऊ नये म्हणून पूर्ण वेळ नवरा तिचा हात पकडून बसलेला असतो. हे पाहून प्रेम दोन्ही कडून टिकवावे लागते या गोष्टीवर विश्वास बसेल. नवरा-बायकोचा हा प्रेमळ व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @asli.shubhh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “प्रेम दोन्ही कडून मिळवले जाते”, “महिलेला श्रीमंत नवरा नको असतो. तिला फक्त प्रेम, काळजी आणि आदर हवा असतो. एक स्त्री त्यातच आनंदी होते”, “करोडो लोकांमधल्या एकालाच अशी बायको मिळते”, “ज्याप्रकारे काकांनी काकूंचा हात पडकला आहे; हे खूपच गोड आहे; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.