Viral Video: जेव्हापासून लोक सोशल मीडियाचा मोठ्या वापर करू लागले आहेत तेव्हापासून हॉलीवूड, बॉलीवूड, तसेच भारतातील इतर विविध भाषांतील नवीन चित्रपट प्रदर्शित झाले की, त्यातील डायलॉग्ज, गाणी, डान्स स्टेप्सदेखील खूप चर्चेत येतात. मग काय सोशल मीडियावर अनेकांना त्या चित्रपटांतील डायलॉग्जवर रील्स बनविल्याशिवाय, तसेच अनेकांना त्यातील गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहवत नाही. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. काही महिन्यांपासून एकीकडे गुलाबी साडी हे मराठी गाणे धुमाकूळ घालत आहे; तर दुसरीकडे ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणी, तसेच आता बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलच्या आगामी ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील चर्चेत असलेले ‘तौबा तौबा’ गाणेदेखील खूप लोकप्रिय होत आहे. या गाण्यावरही खूप युजर्स, अनेक कलाकार रील्स बनविताना दिसत आहेत; पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी तिच्या बाबांबरोबर सुंदर डान्स करताना दिसत आहे.
बाप आणि लेकीचे नाते नेहमी खूप खास असते. लेक आपल्या बाबांसाठी आणि बाबा आपल्या लेकीसाठी काहीही करायला तयार असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक मुलगी तिच्या बाबांबरोबर विक्की कौशलच्या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरामधील टीव्हीवर तौबा तौबा हे गाणे लागलेले असून, एक लहान मुलगी तिच्या बाबांबरोबर या गाण्यावर ठेका धरते. यावेळी ते दोघेही खूप सुंदर डान्स करतात. बाप-लेकीच्या या डान्सचे, तसेच त्यांच्या बॉन्डिंगचे सध्या सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mithi_si_mishri या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत दोन हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा: ‘छोटीशी रखुमाई…’आषाढी एकादशीनिमित्त चिमुकलीचा खास लूक VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “तौबा तौबा.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “एकदम कडक डान्स.” दरम्यान, यापूर्वीदेखील या गाण्यावर अनेक युजर्सनी डान्स केला होता; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.