Viral Video: समाजमाध्यमांमुळे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग मुलांचे तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे, त्यामुळे सोशल मीडियावर आपणही इतरांप्रमाणे आपली कला सादर करून प्रसिद्धी मिळवावी, यासाठी मुलं आणि त्यांचे पालक खूप प्रयत्न करताना दिसतात. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ, अशा प्रकारच्या विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’ ही गाणी तुफान चर्चेत आहेत. आजही या गाण्यांवर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान, आता सोशल मीडियावर ‘मोरनी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली ‘मोरनी’ या गाण्यावर खूप सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी चिमुकली करत असलेल्या डान्समधील स्टेप्स एकापेक्षा एक असून तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही लक्षवेधी आहेत. चिमुकलीचा हा सुंदर डान्स पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसत आहे.

हेही वाचा: ‘जेव्हा मृत्यू आपल्यासमोर असतो..’ वाघाने हत्तीवर बसलेल्या व्यक्तीवर केला हल्ला; पुढे असं काही घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘सुपर क्यूट डान्स’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘किती सुंदर डान्स करते ही’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘एक नंबर डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘अशीच प्रगती कर बाळा’