Girls Fight Viral Video: सोशल मीडियाने अलीकडे गल्लीबोळातल्या नाक्याचे रूप घेतले आहे. ज्याप्रमाणे आधी लोकं नाक्यावर उभी राहून दिवसभरात काय भन्नाट पाहिलं याविषयी चर्चा करायची तसंच आता सोशल मीडियावर आज काय व्हायरल झालं, आज काय ट्रेंडिंग होतं याच्या गप्पा होतात. यामध्ये बहुतांश वेळा भांडणाचे विषय चर्चेचा मुद्दा ठरतात. कधी कुत्र्या मांजराची खरी लढाई तर कधी कुत्र्या-मांजराप्रमाणे भांडणारी माणसं एकूण काय तर सोशल मीडियावर भांडणाच्या व्हिडीओचा तुफान बोलबाला असतो. असाच एका कॉलेजमधील मारामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन तरुणींनी धारण केलेलं रौद्र रूप पाहता प्रकरण बरंच तापलंय म्हणायला हरकत नाही.

प्राप्त माहितीनुसार बंगळुरूच्या दयानंद सागर इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये काहीश्या कारणावरून वादाची ठिणगी पडते आणि मग लाथ, चापट्या, ढकलाढकली, हात पिळवटून जोरदार भांडणं पाहायला मिळतात. नेमकं भांडण कशावरून झालं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वजन काट्यावर एक तरुणी उभी असताना मागून दुसरी येते आणि मग ही लढाई सुरु होते असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तुम्हीच आता हा व्हिडीओ पाहून नेमकं काय झालं असावं याचा अंदाज लावा.

मुलींच्या भांडणाचा व्हायरल व्हिडीओ

.. तर राखी सावंतही बुरखा घालणार; बॉयफ्रेंड आदिल खानसाठी राखीचा मोठा निर्णय

दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने आता समोर आला आहे. यामध्ये गंभीर बाब अशी की अन्य विद्यार्थी भांडण सोडवण्यापेक्षा त्यांना आरडाओरडा करून प्रोत्साहन देत आहेत. हा प्रकार पाहता कॉलेजचे सुरक्षा रक्षक काय झोपा काढत होते का? असे प्रश्न सोशल मीडियावर केले जात आहेत.