Viral Video Grandma Gets Emotional : आपण जी स्वप्न पाहतो, ती पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो; त्यात मोलाचा वाटा हा कुटुंबाचा देखील असतो. त्यामुळे स्वप्न पूर्ण झाल्यावर आपल्यापेक्षा जास्त आनंद कुटुंबातील सदस्यांना होतो. पोलीस अधिकाऱ्यांची वर्दी पहिली की, खूप अभिमान वाटतो. कोणताही दुःखद प्रसंग असो किंवा आनंदाचा क्षण पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र उभे असतात, नागरिकांना न्याय मिळवून देतात. त्यामुळे आपल्या घरातील एखादी तरी व्यक्ती पोलीस किंवा आर्मीत असावी अशी इच्छा आई-बाबांची नक्कीच असते.

तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये पोलिसांच्या वर्दीत पहिल्यांदा घरी आलेल्या मुलाचे कुटुंबाने जंगी स्वागत केलेले दिसते आहे. लेक पहिल्यांदा पोलिसांची वर्दी घालून पहिल्यांदा घरी आला आहे. तो घरी येणार हे आधीच माहिती असल्यामुळे दारात ‘वेलकम’ ची रांगोळी आणि फुलांची सजावट घरातल्यांनी करून ठेवलेली असते.

एकेदिवशी पोलीस पण होणार तू नक्की (Viral Video)

सोनेरी पट्ट्यांनी, फुग्यांनी घराची सजावट केलेली दिसते आहे. त्यानंतर आधी आई मग बायको आणि मग आजी त्यांचे औक्षण करतात आणि खीर खायला देतात. पण, जेव्हा नात आजीच्या पाया पडतो तेव्हा मात्र आजी त्याला चटकन मिठी मारते आणि रडायला लागते. हे पाहून वर्दी घातलेल्या लेकालाही समाधानी वाटते आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हसू येते. वर्दी घालून पहिल्यांदा घरी आलेल्या लेकाचे कसे स्वागत करण्यात आले व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mohiteking_patu_offical_26 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “साहेब झाला” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “नोकरी नोकरी असते भाऊ कोणाला पण वर्दी नाही भेटत”, “मागच्या ट्रॉफी बघून एवढं कळतंय भाऊ काय क्वालिटी चा आहे”, “आजी ला बघून डोळ्यात पाणी आले”, “तयारी चालू राहुदे भावा पोलीस पण होणार नक्की तू”, “कोणाला कमी लेखू नये तो आज होमगार्ड आहे उद्या त्याच्याच जिद्दीने तो एमपीएससी, यूपीएससी देऊन मोठा अधिकारी होईल” ; आदी कौस्तुकास्पद कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.