IAS Officer Pari Bishnoi Mental Health Struggle : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या अनेक प्रेरणादायी प्रवास आपण पहिले आहेत; ज्यामध्ये सामान्य पार्श्वभूमीतून आलेली मंडळी कशाप्रकारे आयएएस, आयपीस अधिकारी झाले याबद्दल जाणून घेता आले. पण, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये आयएएस अधिकारी परी बिश्नोई यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करताना त्यांना आलेल्या मानसिक आणि शारीरिक आव्हानांबद्दल सांगितले आहे.

इन्स्टाग्रामवरील एका व्हिडीओमध्ये, आयएएस अधिकारी यांनी तिच्या पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे होणाऱ्या भावनिक परिणामांबद्दल चर्चा केली. त्यानंतर संघर्षांबद्दल आणि परिवर्तनाबद्दल इच्छुकांना (स्पर्धकांना) सांगितले की, हार मानू नका आणि विजय मिळेपर्यंत धीर धरा. खरा विजय तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही हार मानत नाही. तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता; हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. असे सांगत तिने निराशेपासून उत्तीर्ण होण्यापर्यंतचा मार्ग दाखवला आहे.

४५ किलो वजन वाढले (Viral Video)

आयएएस अधिकारी होण्यापूर्वी बिश्नोई २०१७ मध्ये पहिल्या परीक्षेत नापास झाल्या. मग नंतर त्या राजस्थानला घरी परत आल्या आणि स्वतःला कोंडून ठेवले आहे; ज्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाला. सगळ्यांपासून दूर राहून त्यांनी ताणतणावातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान तिचे ४५ किलो वजन वाढले. त्यांना फक्त शारीरिकच नाही तर भावनिकदृष्ट्याही जड वाटू लागले आणि एक वेळ अशी आली जेव्हा स्वतःला ते ओळखू शक्य होत नव्हत्या.

व्हिडीओ नक्की बघा…

पण, जेव्हा मुलाखतीचा कॉल आला तेव्हा सर्व काही बदलून गेले. फक्त पदासाठी नाही तर स्वतःसाठी लढण्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली. यादरम्यान प्रशिक्षण, निरोगी अन्न खाणे आणि आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी त्या व्यायामशाळेत गेल्या. वजन कमी करणं फक्त आकड्यांबद्दल नव्हतं तर भीती, शंका आणि “मी ही गोष्ट करण्यासाठी पुरेशी नाही” या भावनांपासून मुक्त होण्याबद्दल होते.

२०१९ मध्ये बिश्नोई यांना चिकाटीचे फळ मिळाले जेव्हा त्यांनी यूपीएससी परीक्षेत अखिल भारतीय ३० वा क्रमांक मिळवला, असे द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. बिश्नोईचे लग्न भाजप नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे नातू भव्य बिश्नोई यांच्याशी झाले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये या जोडप्याला मुलगी वेदा झाली. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pari.bishnoii या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.