Viral Video: समाजमाध्यमांमुळे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग मुलांचे तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे, त्यामुळे सोशल मीडियावर आपणही इतरांप्रमाणे आपली कला सादर करून प्रसिद्धी मिळवावी, यासाठी मुलं आणि त्यांचे पालक खूप प्रयत्न करताना दिसतात. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओतील चिमुकली ‘पुष्पा २’ मधील ‘सुसेकी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ, अशा प्रकारच्या विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’ ही गाणी तुफान चर्चेत आहेत. आजही या गाण्यांवर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान, आता सोशल मीडियावर ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सुसेकी’ गाणं खूप चर्चेत आहे, ज्यावर ही चिमुकली ठेका धरताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भारतीय चिमुकली परदेशातील रस्त्यावर सुसेकी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी चिमुकली करत असलेल्या डान्समधील स्टेप्स एकापेक्षा एक असून तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही लक्षवेधी आहेत. चिमुकलीचा डान्स पाहून परदेशातील लोक तिच्याकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत.

हेही वाचा: शक्ती आणि युक्तीचा खेळ! हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्याने लढवली शक्कल अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत सहा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘ही चिमुकली खरंच बॉस आहे’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘आईशप्पथ.. काय नाचतेय ही’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘एक नंबर डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘भविष्यातील हिरोईन.’