सेलिब्रिटी या ना त्या कारणावरून नेहमीच ट्रोल होत असून चांगले आणि वाईट अनुभव येतात. सेलिब्रिटींना त्यांच्या कपड्यांपासून त्यांच्या वागण्याबद्दल टीका सहन करावी लागते. नुकतात अभिनेत्री जान्हवी कपूरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. शुक्रवारी संध्याकाळी मित्र आणि बहिणीसोबत फिरण्यासाठी जान्हवी कपूर गेली होती. यावेळी पॅपराजीने तिला स्पॉट केलं. जान्हवीने काळ्या रंगाचा कटआउट शॉर्ट ड्रेस घातला होता. त्याचबरोबर मॅचिंग हाय हिल्स होते. आता या ड्रेसवरू जान्हवी कपूरला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जान्हवी कपूरचा ड्रेस छोटा असल्याने तिला गाडीत बसताना कठीण जात होतं. मग काय ट्रोलर्संना ट्रोल करण्याची संधी मिळाली. जान्हवी कपूरचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ट्रोलर्स कमेंट्स करत आहेत.

जान्हवीने नुकतेच तिच्या आगामी ‘मिली’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तिने तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिच्या इतर आगामी प्रोजेक्ट्समध्ये आनंद एल राय यांच्या ‘गुड लक जेरी’चा समावेश आहे, ज्याचे शूट तिने मार्चमध्ये पूर्ण केले होते. त्याशिवाय, ती ‘दोस्ताना 2’ मध्ये दिसणार आहे. करण जोहरच्या पीरियड ड्रामा ‘तख्त’मध्येही ती असणार आहे. करीना कपूर, रणवीर सिंग, अनिल कपूर, विकी कौशल आणि इतर सारख्या दिग्गजांसह झळकणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video janhvi kapoor troll because of her dress rmt
First published on: 04-12-2021 at 15:03 IST