Viral Video: प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येत असतात, ज्यात जंगलातील कधीही न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडीओ, तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. पण, हल्ली जंगलांची संख्या कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीतही शिरकाव करतात.

खरं तर, प्राणी असो किंवा माणूस दोघांची आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी ते आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसले असतील. हल्ली सोशल मीडियामुळे अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. या व्हिडीओंमध्ये अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावात घडल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरदिवसा मालगुंड गावातून बिबट्या फिरत असून, काही गावकऱ्यांना अचानक बिबट्याचे दर्शन होते . ते बिबट्याला पाहिल्यावर गाडी थांबवून, त्याचा व्हिडीओ काढायला सुरुवात करतात. यावेळी बिबट्यादेखील एका जागेवर थांबून व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तींकडे एकटक पाहतो. बिबट्याचा हा अॅटिट्यूड पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

इन्स्टाग्रामवरील @amolkolage66 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी त्यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “खूपच डेंजर आहे हा.” दुसऱ्याने लिहिलेय, “बघतोय बघ कसा?”