Viral Video: सोशल मीडियावरील जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. जंगलातील प्राण्यांबाबतीतल्या अनेक गोष्टी पाहण्यासाठी युजर्सही नेहमीच उत्सुक असतात. आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये वाघ, बिबट्या, सिंह किंवा चित्ता या हिंस्र प्राण्यांना नेहमीच इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिले असेल. प्राण्यांची शिकार करण्यासाठी या हिंस्र प्राण्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात. अगदी आपली शिकार शोधण्यापासून ते ती शिकार मिळवण्यापर्यंत हे हिंस्र प्राणी खूप मेहनत घेतात. पण, काही प्राणी असेही असतात जे दुसऱ्याने मिळवलेली शिकार आयती मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यात एका बिबट्याच्या शिकारीवर जंगली कुत्रा डाव साधण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

सोशल मीडियावरील प्राण्यांचे अनेक व्हिडीओ आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असतात, कारण यामध्ये कधी दोन शत्रू प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात, तर अनेकदा दोन मित्र प्राणी एकमेकांवर हल्ला करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यातील घटनेचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलामध्ये एका बिबट्याने हरणाची प्राण्याची शिकार केली असून तो त्याला झाडाच्या फांदीवर लटकवताना दिसतोय. परंतु यावेळी अचानक हरिण खाली पडते. खाली पडलेली आयती शिकार मिळवण्यासाठी दूरवर उभा असलेला तरस तिथे येतो, पण बिबट्या खाली आलेला पाहून तो मागे फिरतो. बिबट्या त्याची शिकार पुन्हा वर घेऊन जातो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @MalaMalaGameReserve या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एका युजरनं लिहिलंय, “खूपच भयानक”, तर आणखी एकानं लिहिलंय, “खूपच छान लक्ष्मी आहे.” तर आणखी एकानं लिहिलंय, “प्राणीपण माणसांसारखेच आहेत, आयत्या गोष्टी शोधतात”, आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, “बरं झालं बिबट्या पटकन आला.”