दिवाळी हा सण केवळ घरातीलच नव्हे, तर ऑफिसमध्येही उत्साहाने साजरा केला जातो. अनेक कंपन्या कर्मचार्यांसाठी सणासुदीच्या दिवशी पार्टी आयोजित करतात, जेथे कामाचा ताण थोडा कमी करून सणाचा आनंद घेता येतो. मात्र, काही प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होतात, जेवढे मजेशीर आणि लक्षवेधी असतात, तेवढेच अनोखेही. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चेत आहे, ज्यात ऑफिसमध्ये नाचणारी एक व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते.
हा व्हिडीओ वैभव छाबरा याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “ऑफिसमध्ये खूप काम होतं; पण ऑफिसमध्ये दिवाळी पार्टीही होती. ‘कामाच्या गर्दीतही दिवाळीचा सण साजरा करणे महत्त्वाचे आहे’ हे या कॅप्शनमधून दिसून येते. व्हिडीओमध्ये कार्यालयातील इतर कर्मचारीदेखील हा सण साजरा करीत असल्याचे दिसून येते; परंतु एक कर्मचारी इतरांपेक्षा वेगळा दिसतो.
पाहा व्हिडिओ
व्हिडीओत तो कर्मचारी हातात लॅपटॉप धरून गाण्याच्या तालावर नाचत आहे. एकीकडे त्याचे काम सुरू आहे, असे दिसते; तर दुसरीकडे तो पार्टीचा पूर्ण आनंद घेत आहे. त्यामुळे हा प्रसंग मजेशीर आणि हटके वाटतो. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून त्याच्या मल्टीटास्किंग कौशल्याचे कौतुक केले आहे.
व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी मनोरंजनात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत; तर काहींनी कामाचा ताण आणि सणाच्या आनंदात संतुलन साधण्याच्या कृतीचे कौतुक केले आहे. एकाने प्रतिक्रिया देत म्हटले की, काम आणि पार्टी एकत्र? हा तर मास्टर आहे. दुसऱ्याने लिहिले की, अरे वा! लॅपटॉप हातात आणि डान्सिंग स्टेप्सदेखील परफेक्ट आहेत. काहींनी व्यक्त केले की, असाच ऑफिसमध्ये सण साजरा करायला हवा, मजा आली पाहून. तर काहींनी म्हटले की, हा तर सगळ्यांना शिकवतोय की, काम आणि मस्ती दोन्ही करता येऊ शकतात.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला आहे. कारण- तो कामाच्या व्यग्रतेतही उत्सव साजरा करण्याचे महत्त्व दर्शवितो. कर्मचाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने उत्सवाचा आनंद घेतला असला तरी हातात लॅपटॉप घेऊन नाचताना या कर्मचाऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिवाळीचा सण केवळ प्रकाश, फुलबाजे आणि मिठायांपर्यंत मर्यादित नसतो. तो कामाच्या जागीही उत्सवाच्या रंगात रंगून जाऊ शकतो हे या व्हिडीओने दाखवले आहे.