Viral Video Man Pulling Elephant Tail For Fun : प्राण्यांना जीव लावला तर ते आयुष्यभर साथ देतील आणि त्रास दिला तर जन्माची अद्दल घडवतील. काही जण स्वतःच्या मनोरंजनासाठी प्राण्यांना नको तशी वागणूक देतात, मारतात, हडतूड करतात, मांजर, श्वानांच्या पिल्लांना उचलून हवं-तसं फेकतात; पण, त्यांचाही जीव असतो, माणसांप्रमाणे त्यांनाही वेदना होतात; हे अनेक जण विसरून जातात. आज सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ असेच काही तरी दाखवतो आहे; जो बघून तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही.
पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथील एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओत मनोरंजनासाठी एका जंगली हत्तीला त्रास देत असल्याचे दिसत आहे. सगळ्यात पहिला हत्तीला थांबवतात आणि दगड फेक करताना, ओरडताना, हत्तीची शेपटी ओढताना दिसत आहेत. यामुळे हत्ती घाबरतो आणि चिडलेला दिसतो आहे. मग थोड्या वेळाने हत्ती माणसांकडे धावत येतो. पण, हा स्थानिक ग्रुप मागे वळून न जाता दगडफेक करण्यास सुरुवात करतो; ज्यामुळे हत्ती आणखीन चिडतो.
प्राण्यांसारखी वागणारी माणसे (Viral Video)
तर वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मेदिनीपूर जिल्ह्यातील मानवी वस्तीजवळून हत्तींचा कळप अन्नाच्या शोधात भटकत होते; त्यादरम्यान गावकऱ्यांमधील एक अज्ञात व्यक्ती हत्तीजवळ जाते आणि शेपटी पकडण्याचा प्रयत्न करते. इथपर्यंत ती थांबत नाही तर नंतर हत्तीवर ओरडण्याचा आणि दगडफेक करताना दिसतो आहे; जे खूपच संतापजनक आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
https://www.instagram.com/reel/DPyEJFiCGUW/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @streetdogsofbombay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करताना दिसत आहेत “इथे नक्की जंगली कोण आहे हाच प्रश्न पडतोय”, “राक्षस… की प्राण्यांसारखी वागणारी माणसे ?” “वन्यजीवांबद्दल माणसांचे लज्जास्पद कृत्य”, “१९७२ चा वन्यजीव संरक्षण कायदा स्पष्टपणे सांगतो की अशा प्रकारे कोणत्याही वन्य प्राण्याला त्रास देणे बेकायदेशीर आहे”, “वनाधिकारी आहात कुठे तुम्ही”, “अशा वाईट आठवणी हत्ती कधीच विसरत नाही; जर भविष्यात तो या माणसाच्या संपर्कात आला तर हत्ती त्या माणसांना कधीही सोडत सोडणार नाही “; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.