सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होता, पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही… याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो. मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. मात्र काहीजण मृत्यूच्या दारातून माघारी येतात.हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल

या व्हिडीओमध्ये तु्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला अगदी आरामात एक व्यक्ती चालताना दिसत आहे. इतक्यात वरून काचेचा एक मोठा तुकडा पडला. हा काचेचा तुकडा त्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला पडतो आणि तो इतका जवळून जातो की त्या व्यक्तीच्या डोक्यावर बांधलेलं कापडंही निघून जातं, त्यानंतर ती व्यक्ती जोरात पडते. काचेचा तुकडा त्याच्या डोक्यावर पडला नाही हे त्याचं भाग्य आहे, नाहीतर जागीच त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले असते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘मुंबईचा वडापाव’ जगात भारी, राजदूत एरिक गार्सेटींनाही वडापावची भुरळ! म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काही नेटकऱ्यांनी तो माणूस सुरक्षित असल्याबद्दल देवाचे आभार मानले.