Viral Video: अपघात आणि दुर्घटना कधीही आणि कुठेही होऊ शकते. यापैकी अनेक अपघाता कित्येकदा स्वत:च्या चूकीमुळे अथवा हलगर्जीपणामुळे होतात. अनेकदा काही लोक माहित असूनही स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. वारंवार अशा कित्येक घटना समोर येऊनही अशा लोकांना काहीही फरक पडत नाही. सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडीओ समोर येत असतात ज्यामुळे काही लोक हलगर्जीपणामुळे स्वत:चा जीव गमावात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामावर एका chemicalburnol नावाच्या अकांउटवर पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, धावत्या रेल्वेमध्ये एक दरवाजात उभा आहे. हा तरुण रेल्वेच्या दरवाज्यातून बाहेर डोकावत आहे. तेवढ्यात त्याचे डोके एका खांबावर आदळते आणि त्यानंतर तोल जाऊन रेल्वेतून बाहेर फेकला जातो. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकते. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – लेकरासह नदीत उडी मारणारच होती महिला तेवढ्यात….; बसचालकामुळे वाचला दोघांचा जीव, पाहा थरारक घटनेचा Video

हेही वाचा – हे भन्नाट आहे राव! महिलेने पर्समधून बाहेर काढली हटके सायकल, चिमुकलीला बसवलं अन्….पाहा व्हायरल VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ पाहून लोकांना बसला धक्का
या घटनेचा व्हिडीओमध्ये या तरुणाच्या मागे उभ्या असलेल्या प्रवाशांनी बनवल्याचे दिसते. या घटनेचा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येईल. कित्येक लोक अशाच प्रकारे रेल्वेमध्ये दरावाजात उभे राहून डोके बाहेर काढातात, दरवाज्यात उभे राहून नको ते स्टंट करतात आणि अपघाताला बळी पडतात. जोपर्यंत त्यांची चूक त्याच्या लक्षात येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोक थक्क झाले आहे. एकाने विचारले की, “तो खरंच पडला का?” तर दुसरा म्हणाला की, “हा व्हिडीओ खरा आहे का?” काही लोक हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा करत आहेत.

हा व्हिडीओ जुना असून सध्या पुन्हा चर्चेत येत आहे. व्हिडीओ नक्की कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.