Viral video: लग्न म्हटलं की मजामस्ती, नाच-गाणी, धिंगाणा पाहायला मिळतोच. त्याशिवाय लग्नात काय काय नवीन पाहायला मिळेल, हेदेखील सांगता येत नाही. लग्नाची मिरवणूक हटके करण्यासाठी वधू-वराची मित्रमंडळी काय करतील याचा काही नेमच राहिला नाही. लग्नात वऱ्हाडी मंडळींचा तर वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. अशाच एका मामांच्या तुफान डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मामा जोमात वऱ्हाडी कोमात

या व्हिडीओमध्ये हे मामा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या मामांचा डान्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल एवढं नक्की.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे मामा लग्नाच्या मिरवणुकीत वेगवेगळ्या स्टेप करत भन्नाट डान्स करत आहेत. यावेळी त्यांच्या हावभावांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. कशाचीही तमा न बाळगता लग्नाच्या वऱ्हाडात ते नाचत आहेत. या मामांनी ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी मंडळी अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, संपूर्ण परिसर वऱ्हाडी मंडळींनी भरलेला दिसून येत आहे. काही वेळानंतर संपूर्ण वऱ्हाडी मंडळी डीजेच्या गाण्यावर डान्स करत आहेत. तिथेच काही तरुणही डान्स करत आहेत, मात्र काही वेळातच हे मामा डान्स करण्यास सुरुवात करतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> एसी ट्रेनचं तिकीट काढताय? दादर स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर rohit_lambe_photography नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना युजरने, असा एक तरी डान्सर असा असतोच असं कॅप्शन दिलं आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.