Viral Video Of Little Boy : परिस्थिती आणि महागाईच्या काळात माणूस जगायला, पैसे कमवायला आणि त्याची बचत करायला शिकतो. काही जण अगदी लहान वयात शिक्षण सुरू असताना काम करून पैसेही कमवायला सुरुवात करतात. वयानुसार समज नसली तरीही जबाबदारीचे ओझे मात्र त्यांच्या खांद्यावर असते. त्यामुळे वय नाही, तर परिस्थिती बघून त्यांना काम करावे लागते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये चिमुकला अनोख्या पद्धतीने पैसे कमावताना दिसतो आहे.

रस्त्याकडेला एक चिमुकला उभा आहे. त्याने अंगाला चंदेरी रंग लावला आहे आणि हुबेहूब गांधीजींच्या गेटअपमध्ये तो तयार झाला आहे. काही तरुणी चिमुकल्याचा हा गेटअप बघून तिथेच थांबल्या आहेत आणि त्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करून घेताना दिसल्या आहेत. एका हातात पुस्तक, दुसऱ्या हातात काठी, डोळ्यांवर चष्मा, खाली धोती, असा लूक त्याने केला आहे आणि पोटा-पाण्यासाठी पैसे कमावताना दिसतो आहे; जे पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

वयापेक्षा जास्त जबाबदारीचे ओझं (Viral Video)

परिस्थिती माणसाला खूप काही करायला लावते. अशा परिस्थितीत माणूस लढायलाही शिकतो आणि स्वत:ला सुधारण्याच्या उद्देशाने कामाला लागतो. मात्र, जीवनात कधी कधी परिस्थितीदेखील माणसासमोर मोठमोठी आव्हाने निर्माण करते. पण, या समस्यांना योग्यरीत्या पार करणेदेखील तितकीच महत्त्वाचे असते; जे या चिमुकलीने आज व्हिडीओत करून दाखवले आहे. वयानुसार तो लहान असला तरीही त्याने पैसे कमवण्यासाठी आणि लोकांचे मनोरंजन करण्यासाठी स्वतःच मार्ग शोधून काढला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pune.jpeg या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘पैसे कधीपर्यंत कमवायचे हे वय नाही तर पोट ठरवते’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत. “जेव्हा वयापेक्षा जास्त जबाबदारीचे ओझं असतं”, “हे देवा, ज्यासाठी तो इतका त्रास सहन करत आहे त्याची इच्छा पूर्ण कर. कारण – मला माहीत आहे गरिबी काय असते”, “चिमुकल्याच्या व्हिडीओला एक लाइक केलाच पाहिजे”, “आत्ताच्या काळात पैसे देण्यासाठी पाकीट उघडण्याआधी खिशातून फोन काढला जातो” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.