Snake Viral Video: घनदाट जंगलात, खेडेगावात साप दिसला तर त्याचं आश्चर्य आपल्याला वाटत नाही. पण आपल्या राहत्या घरात, गल्लीबोळात, आजूबाजूच्या परिसरात, एवढंच नव्हे तर आपल्या शाळा-कॉलेजांमध्ये साप दिसला तर नक्कीच सगळ्यांचा थरकाप उडेल. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार एका शाळेत घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत बुधवारी सापांची एक जोडी – एक नर आणि एक मादी साप – सरपटताना दिसली त्यांचं मिलन सुरू असल्याचं या व्हिडीओतून दिसून येतंय. ही घटना भितरवार तालुक्यातील बमरोल गावातील शाळेत वर्ग सुरू असताना घडली. शाळेतील कर्मचाऱ्यांनी या प्रसंगाचा व्हिडिओ काढला आणि तो बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

व्हायरल व्हिडीओ (Snakes Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या व्हिडिओमध्ये शाळेत एका भरवर्गात दोन साप एकमेकांभोवती गुंडाळले होते. सापांना पाहून अनेकांनी त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सध्या याच व्हिडीओची चर्चा इंटरनेटवर सुरू आहे.

विद्यार्थ्यांनी सर्वात आधी सापांना पाहिले आणि ते घाबरून गेले. त्यांनी लगेचच आपल्या शिक्षिकांना याची माहिती दिली. साप पाहताच शिक्षकांनी सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांना वर्गात बंद केले.

साक्षीदारांच्या मते, दोन्ही साप खूप मोठे होते आणि काही मिनिटे ते एकत्र फिरत होते, जणू काही ते नाचत होते. सुमारे अर्धा तास शाळेत भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नंतर शाळेच्या कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक सापांना बाहेर हाकलले. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

अलीकडच्या पावसामुळे शाळेच्या आजूबाजूला झुडपे आणि पाणी साचलेले असल्याने तेथे साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची वाढ होत आहे, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी अजूनही घाबरलेले आहेत.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @FreePressMPया अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ”ग्वाल्हेरमधील सरकारी शाळेच्या वर्गात सापांचा घिरट्या” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “बापरे, त्या मुलांना किती भीती वाटली असेल” तर दुसऱ्याने “शाळेत एवढा साप शिरेपर्यंत हे करतात काय” अशी कमेंट केली. तर एक कमेंट करत म्हणाला, “मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे हा”