Shocking Video: छत्तीसगडमधील बालोदाबाजार येथे एका दुकानदाराच्या मुलाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. दारूच्या नशेत असलेला मुलगा त्याच्या दिव्यांग वडिलांवर हल्ला करण्यासाठी त्याच्या दुचाकीवरून दुकानात घुसला. ही घटना १७ जून रोजी घडली.

नरेंद्र सिंग चावला यांचा मोठा मुलगा अमरजीत त्याच्या दुचाकीवरून दुकानात आला आणि त्याने त्याच्या वडिलांवर आक्रमकपणे हल्ला केला. दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा थरारक क्षण कैद झाला.

मुलाने केला वडिलांवर हल्ला (Son attacks Father Video Viral)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दुकानदार डेस्क सेट करत ग्राहकांची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. दुचाकी येताना पाहून दुकानदार लंगडत बाहेर पडतानाही दिसले. तथापि, ती गाडी कोणत्याही ग्राहकाची नव्हती. तर ती गाडी त्यांच्या मुलाची होती, जो रागाने त्यांच्याकडे येत होता.

अमरजीत त्याच्या वडिलांकडे झुकला आणि त्याने त्यांच्यावर वारंवार चाकूने हल्ला केला. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये हा धक्कादायक हल्ला कैद झाला आणि मुलगा त्याच्या वडिलांना दहापेक्षा जास्त वेळा चाकूने वार करताना दिसला. या हल्ल्यादरम्यान, दुकानदार वेदनेने ओरडत होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @FirstHeadl24x7 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “कलयुगातील एका मुलाचे क्रूर रूप! छत्तीसगडमधील रायपूरमध्ये एका मद्यधुंद मुलाने स्वतःच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे – ती पाहिल्यानंतर थरकाप उडेल!”

नवभारत टाईम्समधील एका वृत्तानुसार, अमरजीतने त्याच्या वडिलांवर १५ वेळा चाकूने वार केले. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा हल्ला अवघ्या ३० सेकंदात करण्यात आला.

घटनेच्या वेळी तो माणूस दारूच्या नशेत होता हे कळले. पूर्वी शिक्षक आणि आता नोकरीवरून काढून टाकण्यात आलेला अमरजीत नोकरी गेल्याबद्दल त्याच्या पालकांना जबाबदार धरतो. सध्या, त्यचे वडील वैद्यकीय उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडिलांनी आपल्या मुलाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अमरजीतला अटक करण्यात आली आहे.