Viral Video: या जगात अनेक विषारी आणि भयानक प्राणी आहेत. यातील काही खूप दुर्मीळ असून ज्यांना आपण कधी पाहिलेलंही नाही. पण, याच विषारी आणि भयानक प्राण्यांच्या यादीत सापाचाही समावेश आहे. साप म्हटलं की नेहमीच अनेकांच्या अंगावर काटा येतो. सोशल मीडियामुळे सतत विविध प्राण्यांची माहिती, व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. यात अनेकदा सापाचेदेखील थरारक व्हिडीओ आपण पाहतो. अशातच आता सापाचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून काहीक्षण तुम्हीही गोंधळून जाल.

मागील अनेक दिवसांपासून सतत सापांचे विविध व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. पण, अशा प्रकारच्या सापांना आपण अनेकदा पाहिले आहे. परंतु, सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील साप पाहून तुम्हीदेखील काहीसे आश्चर्यचकित व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घराच्या दाराजवळ एक ४-५ फुटांचा साप दिसत आहे, पण त्याच्याकडे तुम्ही जर नीट लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला कळेल की, या सापाला पालीप्रमाणे पाय असून त्याचे तोंडदेखील थोडे वेगळे आहे. शिवाय त्याच्या तोडांपासून पायापर्यंतच्या भागावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या दिसत आहेत. या सापाच्या शरीराचा पुढचा भाग थोडाफार सापसुरळीप्रमाणे दिसत आहे. पण, या व्हिडीओतील साप खरा आहे की खोटा हे कळून येत नाही, कारण- यातील साप जराही हलताना दिसत नाही.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @balichannel या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओ खालील कॅप्शनमध्ये “हा कोणता प्राणी आहे हे कोणाला ठाऊक आहे का?” असं लिहिण्यात आलं आहे. यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एकाने लिहिलंय की, “हा साप नाही, बहुतेक सापसुरळी आहे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हा व्हिडीओ फेक आहे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “देव याला विसरला वाटतं.” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “ही बहुतेक सापाची मावशी असेल.”

हेही वाचा: ‘बादल बरसा बिजुली’, प्रसिद्ध गाण्यावर चिमुकल्याचे क्यूट एक्सप्रेशन्स; ४० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला VIDEO

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by BaliChannel (@balichannel)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून सोळा हजारांहून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वीदेखील असेच काही सापाचे व्हिडीओ समोर आले होते, ज्यात एक साप चक्क टॉयलेटमधून बाहेर आला होता.