Cops Check Passenger Bag Without Permission : स्त्री-पुरूष समानतेबाबत भरभरून बोलले जात असताना स्त्रियांवरील दडपण, त्यांच्यावर एकटं बाहेर पडण्याचा सल्ला, ठरलेल्या वेळेत घरी येण्याचे नियम नकळत लादले जातात. हे नियम त्यांच्या सुरक्षेसाठीच लावले जातात. कारण आपल्या आसपास अशी अनेक माणसे असतात; जी चांगुलपणाचा मुखवटा लावून आपला फायदा सुद्धा घेऊ शकतात. त्यामुळे संरक्षण करण्यासाठी काही पोलीस दल आपल्या सेवेत हजर असतात. पण, यांच्यावरचाही विश्वास उडाला तर…. आज असाच एक प्रकार ट्रेन प्रवासादरम्यान तरुणीबरोबर घडला आहे.
सायबा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओनुसार सकाळी ५ वाजता काही पोलीस अधिकारी ट्रेनमध्ये आले. त्यानंतर अचानक ते काही महिलांच्या बॅगची तपासणी करू लागले. पोलिसाने तरुणीला ओळख विचारली, तिचे सामान तपासले . एवढेच नाही तर स्वतःचा आयडी न दाखवता, परवानगी न घेता त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. प्रवासी तरुणीने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ पाहण्याची मागणी सुद्धा केली. पण, पोलिसांनी दुर्लक्ष केले.
पोलिसांनी तिचा व्हिडीओ का काढला? (Viral Video)
या घटनेचा व्हिडीओ शेअर करत तरुणीने “पुरुष पोलिस अधिकारी महिलांच्या बॅगा कशा तपासू शकतात? फक्त महिला पोलिस अधिकारी यांनाच हक्क आहे. जेव्हा मी त्यांना त्यांचा आयडी दाखवायला सांगितला किंवा ते पोलिस आहेत की नाही याची खातरजमा करायला सांगितली तेव्हा त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हे चुकीचे आहे. प्रत्येक प्रवाशाने आपले हक्क माहिती असले पाहिजे. तपासणी होत असेल, तर सगळ्यांच्या पिशव्या तपासल्या पाहिजेत, फक्त एका व्यक्तीच्या नाही” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sai.ba19 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत आणि तपासणी दरम्यान प्रवाशांना अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा अधिकार असल्याचे सांगून इतरांनी महिलेचे समर्थन केले. तर अनेक जण “पण ते परवानगी शिवाय सामान का तपासत आहेत”, “पोलिसांनी तिचा व्हिडीओ का काढला” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.