Viral Video: जसा काळ बदलतो तशी माणसे, त्यांचे स्वभाव, गुण, आवडी-निवडीदेखील बदलतात. या सगळ्याचे जिवंत उदाहरण सतत आपल्या डोळ्यांसमोर दिसत असते. सध्याची पिढी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे. सोशल मीडियावरील सर्वच गोष्टी वाईट नसल्या तरी हल्लीच्या मुलांना काही गोष्टी वयाच्या आधीच कळतात. पूर्वी शाळा म्हटले की, शाळेंचा गृहपाठ, रुसवे-फुगवे, खेळ, कविता, मजा-मस्ती आठवते. पण हल्लीच्या मुलांना या गोष्टींची फारशी ओढ दिसून येत नाही. अनेकदा शाळांबाहेर शाळेतील प्रेम प्रकरणे मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील अवाक व्हाल.

आयुष्यात एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे ही खूप सुखद आणि सुंदर भावना आहे. त्याशिवाय आयुष्यातील पहिले प्रेम नेहमीच खास आणि न विसरणारे असते, असे म्हटले जाते. पण, अनेकदा अल्लड वयात काही तरुण-तरुणी भावनेच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. या संदर्भातील अनेक किस्से तुम्ही ऐकलेच असतील. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येही असेच काहीतरी पाहायला मिळत आहे; जे पाहून युजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही शाळकरी मुली एका गल्लीमध्ये उभ्या आहेत. यावेळी त्या मुलींमधील एका मुलीचा प्रियकर येतो आणि तिच्या भांगेत कुंकू भरतो. यावेळी तीदेखील हसत हसत त्याला प्रतिसाद देते. शेजारी उभ्या असलेल्या या मुलीच्या मैत्रिणी त्या दोघांकडेही मोठ्या कौतुकाने पाहतात. त्यानंतर ती मुलगीदेखील तिच्या हाताने त्याला कुंकू लावते. त्यानंतर ते सर्व जण त्या मुलीच्या डोक्यावर कुंकू टाकतात.

परंतु, हा व्हिडीओ कदाचित रंगपंचमीच्या काळातील असून प्रियकर रंग लावण्याच्या बहाण्याने त्याच्या प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ X(ट्विटर)वरील @Nikhil Gupta या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे,. त्यामध्ये त्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘मी एकटाच का बघू; हे तुम्हीपण बघा’. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास पाच लाखांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आणि एक हजारहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: असले मित्र नको रे बाबा! नवरदेवाच्या मित्रांनी लग्न विधी सुरू असताना गुरुजींच्या डोक्यात घातली पिशवी अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून व्यक्त कराल संताप

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिलेय, “हे पाहण्याआधी मी मेलो का नाही?” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “यांच्या घरचे काही बोलत नाहीत का?” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “सदा सुखी राहा.” तर आणखी एकाने लिहिलेय, “पैसे वाचले यांचे. नेहमी सुखी राहा.”